Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • संतापजनक! पाच शिक्षकांनी १३ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्षभर केला बलात्कार
Top News

संतापजनक! पाच शिक्षकांनी १३ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्षभर केला बलात्कार

Student raped

Student raped : शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना (Shocking incident) ओडिशातून समोर आली आहे. केंद्रपाडा जिल्ह्यातील एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका 13 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार (13-year-old student raped) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सातवीच्या शिकणाऱ्या या विद्यार्थिनीवर 5 शिक्षकांनी वर्षभर बलात्कार (5 teachers raped her for a year) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून आता आरोपींना पोलिसांनी बेड्या (Arrest on charges) ठोकल्या आहेत.

पीटीआय वृत्तानुसार, गेल्या महिन्यात अल्पवयीन पीडितेने आईला याबाबत माहिती दिली, त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या नंतर मुलीच्या कुटुंबाने बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी) कडे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. दुसऱ्याच दिवशी, सीडब्ल्यूसीच्या पथकाने शाळेला भेट दिली आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली. हे एक संवेदनशील प्रकरण असल्याने पोलिसांनी पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे आणि एफआयआरमध्ये नाव असलेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही एक संवेदनशील बाब आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक या तपासावर लक्ष ठेवणार आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबाचा आरोप आहे की, विद्यार्थिनीवर तब्बल एका वर्षापासून वारंवार बलात्कार करण्यात आला. एका महिला शिक्षिकेसह इतर काही शिक्षक आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहितीही समोर आली आहे. तसेच या घटनेतील आरोपी शिक्षकांनी विद्यार्थिनीला घटनेबद्दल कोणाला काही न सांगण्याची धमकीही दिली असल्याचेही समोर आले आहे.

शाळाने सांगितले आहे की, आम्ही शाळेच्या प्रशासनाला या घटनेची माहिती दिली होती, मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, ‘कुटुंबाने केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे तक्रार केल्यानंतरच आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. आता चौकशीनंतरच संपूर्ण सत्य समोर येईल.’

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts