• Home
  • महाराष्ट्र
  • लुडोच्या वादातून मामाकडून भाच्याची हत्या; अल्पवयीन आरोपी ताब्यात
Top News

लुडोच्या वादातून मामाकडून भाच्याची हत्या; अल्पवयीन आरोपी ताब्यात

Ludo dispute murder

Ludo dispute murder : गेल्या काही दिवसांपासून तरुण गेम खेळण्याच्या आहारी जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अनेक जण पबजी या गेमच्या आहारी गेल्याचे दिसून येत होते. अनेक जण तासान् तास एकाच जागेवर बसून हा गेम खेळताना दिसत आहे. त्यामुळे काही जणांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले होते. काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका मुलाची तर डोक्याची नस फाटली होती. तो तो तासन् तास एकाच जाग्यावर बसू हेडफोन टाकून पबजी गेम खेळत असे. त्यामुळे त्याच्या शरीरातील नसांवर परिमाण व्हायचा. एका दिवशी तो गेम खेळत असताना अचानक त्याला तीव्र डोकेदुखी जाणवली आणि तो चक्कर खाऊन पडला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता, त्याच्या डोक्यात रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले. या गेमच्या वादातून हत्या झाल्याची घटना देखील समोर आल्या होत्या.

मात्र आता लुडो गेमसाठी कल्याणमधील उंबर्डे परिसरात अल्पवयीन मामाने भाच्यावर थेट चाकूने हल्ला केला. गोकूळ नेपाळी आणि अल्पवयीन मामा दोघे गेम असताना त्यांच्यात गेम खेळण्यावरुन वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की गोकूळ नेपाळी झोपेत असताना मामाने त्याच्यावर वार केले. चाकूने केलेल्या हल्ल्यात गोकूळ नेपाळीचा जागीच मृत्यू झाला. खडकपाडा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

तरुण गेम खेळण्याच्या किती आहारी

या घटनेवरुन तरुण गेम खेळण्याच्या किती आहारी गेल्याचे दिसून येत आहे. केवळ गेम खेळताना वाद झाल्याने झोपलेल्या भाच्यावर थेट मामाने चाकूने हल्ला केला. आई-वडिलांनी मुलांना गेम खेळण्याच्या या नशेपासून रोखले पाहिजे. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. मुंब्र्यात लुडो गेम खेळताना 19 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. 20 वर्षीय आरोपी आणि मृत यांच्यात लुडो गेम खेळताना किरकोळ वाद झाला. याच वादातून आरोपीने मृतावर चाकूने हल्ला केला. यानंतर त्याला पोलिसांनी आध्र प्रदेशमधून अटक केली होती.

वेळेवर जेवण आणि झोप न झाल्याने अनेक जण डिप्रेशनमध्ये जातात

दररोज तासन् तास एकाच जागेवर बसून गेम खेळल्याने डोळ्यावर परिणाम होतो. तसंच मानसिकतेवर देखील परिणाम होऊन चिडचिडपणा येतो. अनेका रात्री झोप येत नाही. झोप न येणे आणि वेळेवर जेवण न करणे यामुळे मानसिकतेवर परिणाम होऊन अनेक जण डिप्रेशनमध्ये जातात. याच डिप्रेशनमधून ते कोणते पाऊल उचलत आहे, हे त्यांना कळत नाही आणि मग कल्याण सारखी घटना घडते.

४०% तरुण दिवसातील ५ ते ७ तास मोबाईल गेम्सवर घालवत

एका सर्वेक्षणानुसार, भारतातील जवळपास ४०% तरुण दिवसातील ५ ते ७ तास मोबाईल गेम्सवर घालवत आहेत. यामध्ये केवळ मनोरंजनाचा भाग नसून, पैशांची जुगार आणि वर्चस्वाची लढाई देखील सामील झाली आहे. अनेक जण गेम खेळताना त्यावर पैज लावतात..किंवा पैसे लावून लुडो गेम खेळतात. याच पैशावरुन वाद होतो आणि यातून हत्येसारख्या घटना घडतात..कल्याणमधील घटनेत देखील पैशाचे काही कारण होते का? गेम खेळण्यावरु न हा वाद झाला की यामागे दुसरं काही कारण होतं? अशी अनेक प्रश्न निर्माण झाली आहे. भारतात गेम खेळण्यावर मर्यादा आल्या पाहिजेत. काही मिनिट गेम खेळल्यानंतर गेम आपोआप बंद व्हायला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts