Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • साखरपुडा मुलीचा अन् आईनेच प्रियकरासोबत लग्न उरकलं, व्हॉट्सॲप स्टेटसने खळबळ
Top News

साखरपुडा मुलीचा अन् आईनेच प्रियकरासोबत लग्न उरकलं, व्हॉट्सॲप स्टेटसने खळबळ

Mother married her lover

Mother married her lover : जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात एक अशी घटना घडली आहे की, ऐकून मन हेलावून जाते आणि समाजाच्या नात्यांच्या नाजूक धाग्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. एका कुटुंबात आनंदाचे वातावरण होतं. मुलीचा साखरपुडा निश्चित झाला होता आणि तो अवघ्या पाच दिवसांवर आला होता. घरात लग्नाच्या तयारीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. नव्या कपड्यांची खरेदी, मंगल कार्याची चर्चा, नातेवाईकांची गर्दी आणि मुलीच्या भविष्याबाबतचे स्वप्नरंग सजले होते.

मात्र, या आनंदाच्या क्षणीच घरावर अविश्वसनीय संकट कोसळलं. मुलीची आईच आपल्या प्रियकरासोबत घर सोडून पळाली आणि त्याच्याशी लग्न करून टाकलं. ही बातमी घरच्यांना समजली तेव्हा सगळे स्तब्ध झाले. एक आई, जी मुलीसाठी जगण्याचं कारण असते, तिनेच अशा क्षणी कुटुंबाशी फार मोठा विश्वासघात केला.

लग्नाचे फोटो आणि व्हॉट्सॲप स्टेटस

सर्वात मोठा धक्का मात्र पुढे होता. लग्नानंतर प्रियकराने दोघांचे फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर लावले. एका क्षणात प्रकरण उघड झालं. नातेवाईक, शेजारी, मित्र-मंडळी सगळ्यांच्या मोबाईलवर ते फोटो पोहोचले. चर्चा जोरात पसरली आणि त्या कुटुंबाची अब्रू समाजासमोर उघडी पडली. ज्या घरात काही दिवसांपूर्वी हास्य आणि उत्साह भरलेला होता, तिथे एकदम शोक आणि स्तब्धता पसरली. मुलीचे मन किती खोलवर तुटलं असेल, वडिलांच्या आत्मसन्मानाला किती जखमा पोहोचल्या असतील, याची कल्पना करणेदेखील कठीण आहे.

साहेब तेवढं स्टेटस काढण्यास सांगा विनंती आहे

पाच दिवसांवर मुलीचा साखरपुडा असताना आईचा हा निर्णय आणि त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा. या दोन्हींनी कुटुंबीयांसाठी मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या मोठा आघात होता. हतबल झालेल्या वडिलांनी शेवटी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. डोळ्यात अश्रू आणून पोलिसांपुढे विनावनी केली.
“साहेब, माझ्या मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर आहे. आमची समाजात फार मोठी बदनामी होत आहे. विनंती आहे ते स्टेटस तातडीने काढण्यस तेवढं सांगा.

ही केवळ बातमी नाही तर समाजासाठी चेतावणी आहे

पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता पाहून तपासाची चक्र फिरवली. संबंधित व्यक्तीला बोलावून कायद्याची जाणीव करून दिली आणि स्टेटस तात्काळ काढायला लावले. त्यामुळे थोडाफार पिडित कुटुंबाला तात्पुरता दिलासा मिळाला, पण जे नुकसान झालंय ते भरून निघणं कठीम आहे. ही घटना आता संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. काहीजण सहानुभूती व्यक्त करत आहेत, तर काहीजण या कृत्याची तीव्र निंदा व्यक्त करत आहेत. पण या सगळ्यात एक प्रश्न मात्र सतावतोय, नात्यांची जबाबदारी, विश्वास आणि कुटुंबातील मूल्यं यांचं आजकाल काय मूल्य उरलं आहे? ही फक्त एक बातमी नाही, तर अनेक कुटुंबांसाठी चेतावणी आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts