Lucknow 19 Year Old Son Kills His Father | आजकाल किरकोळ रागातून हत्या (Murder) केल्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. तर आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये लखनऊमधील एका 19 वर्षांच्या मुलानं (Son) चक्क आपल्या वडिलांची (Father) हत्या केली आहे, ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून मुलानं आपल्या वडिलांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं घडलं काय?
20 फेब्रुवारीला पहाटे साडेचारच्या सुमारास 19 वर्षीय अक्षत आणि त्याचे 50 वर्षीय वडील मानवेंद्र सिंह यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढत गेला की रागाच्या भरात अक्षतने आपल्या वडिलांवर गोळी झाडली. त्यानंतर वडील मानवेंद्र सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर रागाच्या भरात अक्षतने जे केलं ते ऐकून कोणालाही धक्का बसेल.
वडीलांच्या हत्येनंतर अक्षतने पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं
वडीलांच्या हत्येनंतर अक्षतने पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यानं तिसऱ्या मजल्यावर असलेला वडिलांचा मृतदेह तळमजल्यावर आणला. तिथे त्याने एका रिकाम्या खोलीत नेऊन मृतदेहाचे तुकडे केले. तुकडे केल्यानंतर त्याने काही अवयव बाहेर फेकून दिले तर उरलेलं धड एका निळ्या रंगाच्या ड्रममध्ये लपवून ठेवले. जेव्हा त्या ड्रममधून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं आणि पोलिसांनी खोल तपास करत अक्षतला ताब्यात घेतलं.
त्यानं हे सर्व कृत्य एकट्यानेच केल्याची कबुली दिली
चौकशीदरम्यान पोलिसांनी अक्षतला “तुझ्यावर परीक्षेचा दबाव आहे का?” असं विचारलं असता त्याने मान हलवून ‘हो’ असं उत्तर दिलं. तसेच त्यानं हे सर्व कृत्य एकट्यानेच केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी अक्षतवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.












