Ajit Pawar Plane Crash | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानं संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) खळबळ उडाली आहे. त्यांच्या अपघाती निधनानंतर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. अजित पवारांचा खरच अपघात झालेला की घातपात? असा सवाल अजूनही उपस्थित केला जात आहे. तर दादांच्या अपघाताबाबतचे अनेक खुलासे दररोज होताना दिसत आहेत. आताही दादांच्या अपघाताबाबत एक असा मोठा खुलासा झाला आहे ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, पोलादपूर पोलिसांकडून तपासाला वेग
जेव्हा अजित पवारांच्या विमानाचा अपघात (Ajit Pawar Plane Crash) झाला त्यानंतर या अपघाताचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. तसेच काही धक्कादायक माहिती देखील उघड झाली होती. यामध्ये अजित पवारांच्या विमानाचे नियोजित पायलट अचानक बदलण्यात आले होते, यावरून मोठा संशय व्यक्त केला जात आहे.
अजित पवारांच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती उघड
दुसरीकडे, अजित पवार मुंबईहून विमानतळाकडे निघाले असताना त्यादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले. मात्र, DGCA ने ते देण्यास नकार दिला. त्यामुळे आता या अपघाताची चौकशी एसआयटीमार्फत करण्याचे आदेश देण्याची मागणी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. तसेच माहिती अधिकार कार्येकर्ते केतन तिरोडकर यांनी अजित दादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी आणि अजित पवारांचा अपघातात मृत्यू होण्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं? याबाबतचे प्रश्न करणारी याचिका दाखल केली आहे.
केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल करण्यापूर्वी त्यांनी DGCA ला एक मेल करून याबाबतची विचारणा केली होती. मात्र, तिरोडकरांना याबाबतची माहिती दिली नसल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामुळे तिरोडकरांनी याबाबतच थेट कोर्टात याचिका दाखल केली आहे.












