Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात नवीन खुलासा; चार आरोपी अटकेत, SIT गठीत
गुन्हा

परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात नवीन खुलासा; चार आरोपी अटकेत, SIT गठीत

Paratwada

Paratwada Sexual Exploitation Case: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा मोठा भांडाफोड झाला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडिओंच्या आधारे उघडकीस आलेल्या या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले आहे.

अमरावती | अनिरुध्द उगले, प्रतिनिधी

अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आलेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या गंभीर प्रकरणाचा छडा लावला.

गुन्हा दाखल

या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (वय १९, रा. परतवाडा) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, POCSO कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईल फोनमधून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांना १८ पीडित मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ आक्षेपार्ह फोटो आढळून आले. या व्हिडिओंच्या आधारे आरोपी संबंधित मुलींना ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, हा गुन्हा आरोपीने एकट्यानेच नव्हे तर इतर साथीदारांच्या मदतीने केल्याचे तपासात उघड झाले आहे.

पुढील कारवाईत पोलिसांनी उझेर खान इकबाल खान (वय २०, रा. अचलपूर), मो. साद मो. सव्वार (वय २२) आणि तरंज खान तसलीम खान (वय २४, रा. अचलपूर) यांना देखील अटक केली आहे. या सर्व आरोपींनी आक्षेपार्ह व्हिडिओ एकमेकांमध्ये शेअर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रकरणात वापरण्यात आलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून सायबर तज्ञांच्या मदतीने सखोल तपास सुरू आहे.

मुलींचे लैंगिक शोषण

तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून, मुख्य आरोपी अयानने काही पीडित मुलींचे लैंगिक शोषण अमरावती शहरातील मित्राच्या भाड्याच्या खोलीत केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या ठिकाणाचा शोध घेत तपास अधिक तीव्र केला आहे. तसेच काही व्हिडिओ इतर व्यक्तींना पाठविण्यात आल्याची शक्यता असल्याने त्या अनुषंगानेही चौकशी सुरू आहे.

SIT

या गंभीर प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले आहे. या पथकात १० अधिकारी आणि ३६ कर्मचाऱ्यांचा समावेश असून ते सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान, पोलिसांनी पीडित मुली व त्यांच्या कुटुंबियांना पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी खात्रीही पोलिसांनी दिली आहे. यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले असून नागरिकांनीही या प्रकरणात माहिती असल्यास पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, कोणत्याही व्यक्तीने किंवा माध्यमांनी पीडितांची ओळख उघड करणारे फोटो, व्हिडिओ किंवा माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही अमरावती ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts