Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “त्या इमारतीत आत्मे आहेत, जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर…”, संजय शिरसाटांचा विचित्र दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
Top News

“त्या इमारतीत आत्मे आहेत, जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर…”, संजय शिरसाटांचा विचित्र दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

Sanjay Shirsat | शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील एका कार्यक्रमादरम्यान विचित्र दावा केला आहे, ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या इमारतीत भूत असून ते लोकांना त्रास देत असल्याचा विचित्र दावा संजय शिरसाटांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – “…म्हणून खरातवर कोणी कारवाई करत नव्हतं”; विखे पाटलांनी सांगितलं ‘राजकीय कनेक्शन’, केला मोठा दावा

संजय शिरसाटांनी नेमका काय केला दावा?

एका कार्यक्रमादरम्यान संजय शिरसाट म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या इमारतीच्या जागेवर पूर्वी मृतदेह पुरते होते. हा एक स्मशानभूमीच भार असल्यामुळे येथे मृतदेह पुरले जात होते. त्यामुळे मला असं वाटतं की, येथील आत्मे लोकांना कधीकधी घाबरवतात आणि त्यांना अस्वस्थ करतात. जर तुम्हाला यापू भुतांपासून मुक्ती हवी असेल तर ही इमारत एका चांगल्या ठिकाणी हलवा. यामुळे आत्म्यांना आणि लोकांवा दोघांनाही दिलासा मिळेल, असा खळबळजनक दावा शिरसाटांनी केला आहे.

महानगरपालिकेच्या इमारतीबाबत संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

संजय शिरसाटांनी महानगरपालिकेची ही इमारत अशुभ असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, या इमारतीत आत्मे असल्यामुळे ही इमारत अशुभ आहे. ही इमारत विकासकामांमध्ये अडथळा आणत आहे. सध्याच्या या इमारतीत बदल करून काहीही उपयोग होणार नाही. आपल्या शहराच्या भविष्यासाठी नवीन इमारत बांधणे आवश्यक आहे. नवीन महानगरपालिका इमारत ही पंचवटी चौकासारख्या चांगल्या ठिकाणी बांधण्यात यावी, अशी कल्पना संजय शिरसाटांनी सुचवली. तसेच त्यांनी नवीन इमारतीसाठी आवश्यक निधी मिळवून देण्याचे देखील आश्वासन दिले आहे.

संजय शिरसाट यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अग्निशमन दलाची क्षमता वाढवण्याच्या महानगरपालिकेच्या उपक्रमाला मोठा धक्का बसला आहे. तसेच शिरसाटांनी केलेल्या या विचित्र दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. शिरसाटांचं हे वक्तव्य असंवेदनशील असल्याचं काहींनी म्हटलं आहे. तसेच सध्या शिरसाटांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts