• Home
  • राजकारण
  • निदा खान हिला संभाजीनगर मधून अटक; जलील यांच्या चौकशीची मागणी
Top News

निदा खान हिला संभाजीनगर मधून अटक; जलील यांच्या चौकशीची मागणी

Nashik TCS Nida Khan Arrest :

Nashik TCS Nida Khan Arrest : नाशिक येथील बहुचर्चित कॉपोरेट जिहादच्या केसबाबत एक नवीन बातमी समोर आले आहे. मुख्य संशयित आरोपी मानल्या जाणाऱ्या निदा खान हिला काल नाशिक पोलिसांनी संभाजीनगर येथून अटक केली आहे. या प्रकरणावर आता राजकारण नव्याने रंगात आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी निदा खान हिला फरार होण्यासाठी एमआयएम चे नेते इम्तियाज जलील यांचा हात असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. निदा खान गेले अनेक दिवस पोलिसांना हुलकावणी देऊन फरार होती.

काही दिवसांपूर्वी नाशिक येथील एका मोठ्या कंपनी मध्ये काम करणाऱ्या काही महिलांनी आपल्यावर लैगिक अत्याचार व धर्मांतरणासाठी दबाव टाकल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. या प्रकारचा जसजसा तपास होतहोता तसे अनेक पैलू समोर येत होते. या तपासात ६ आरोपीना ताब्यात घेतले होते मात्र, प्रमुख आरोपी मानली जाणारी हिना खान गेले ४० दिवस फरार होती. अखेर पोलिसांनी  रात्री हिना खान हिला अटकेत घेतले आहे.

संजय शिरसाट यांनी एका माध्यमाशी बोलताना एमआयएम चे नेते इम्तियाज जलील यांच्यावर घणाघाती निशाणा साधत निदा खान हिला फरार होण्यास इम्तियाज जलील यांचा हात आहे असे म्हणले आहे. इम्तियाज जलील यांच्या मुंब्र्याच्या भाषणाचा व निदा खान हिच्या बाजूने बोलल्याचा हवाला यावेळी संजय शिरसाट यांनी दिला आहे. तसेच हे खूप मोठे रॅकेट असून निदा हा खान हा एक छोटास मोहरा आहे तर असून खरे सूत्रधार वेगळेच आहेत असे देखील संजय शिरसाट ह्यांनी म्हणले आहे. त्यासोबतच जलील यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

निदा खान ही या प्रकरणातील महत्त्वाची दुवा असल्याचे बोलले जात आहे. तिच्या चौकशीतून हे धर्मांतरणाचे रॅकेट नेमके कोठपर्यंत पसरले आहे? आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. पोलीस आता तिला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. आता या सर्व प्रकारानंतर आणखी काय प्रकार समोर येतात व कसे राजकारण रंगते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts