Amravati Paratwada Molestation Case | अमरावतीमध्ये (Amravati) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावतीच्या परतवाडा (Paratwada) येथील 180 मुलींचे लैंगिक शोषण करून व्हिडीओ व्हायरल करण्याता आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला अटक केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण अमरावतीमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा – 5. धक्कादायक! नाशिकमध्ये शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला, परिसरात तणाव, नेमंक घडलं काय?
नगरपरिषद आरोपीच्या घराचे अतिक्रमण पाडणार?
या प्रकरणी अमरावती प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरच्या घरावर बुलडोजरची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. अचलपूर नगरपरिषद आरोपीच्या घराचे अतिक्रमण पाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आरोपीच्या घराजवळ पोलिसांचा बंदोबस्त देखील करण्यात आला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपीने त्याच्या घराचा काही भाग अतिक्रमण करून बांधला असल्याचा संशय नगरपरिषदेला आहे. त्यामुळे आरोपीच्या कुटुंबाला नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण संदर्भात नोटीस दिली असल्याची माहिती समोर आली आहे. तर आता नगरपरिषद आरोपीच्या घराचे अतिक्रमण पाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परतवाडा शहरातील अनेक तरूणींना फसवत त्यांचे लैंगिक शोषण करून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर परतवाडा शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच अचलपूर-परतवाडा शहरांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील करण्यात आला आङे. या घटनेचा निषध करताना कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. तर या प्रकरणातील आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची, त्याला फाशी देण्याची मागणी नागरिकांकडून आणि राजकीय नेत्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीरने अनेक तरूणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने या तरूणींचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढत ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मदवर गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी मोहम्मद हा अनेक तरूणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत होता आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करत होता. आरोपी मोहम्मदने जवळपास 180 मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आरोपीने तरूणींसोबत शरीरसंबंध ठेवत व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. तर त्याने हे व्हिडीओ व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला आहे.






