Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • इस्त्रायलवर घातक हल्ला! इराणची मिसाईल थेट बेतशेमेशमध्ये, 12 जणांचा मृत्यू
ताज्या बातम्या

इस्त्रायलवर घातक हल्ला! इराणची मिसाईल थेट बेतशेमेशमध्ये, 12 जणांचा मृत्यू

Iran Attack On Israel | अमेरिका-इस्त्रायल (America-Israel) या दोशांनी इराणवर (Iran) हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामनेई (Ayatollah Ali Khamenenei) यांचा मृत्यू झाला आहे. खामनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये संतापाचे वातावरण आहे. तसेच खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणकडून इस्त्रायल आणि आजूबाजूच्या देशात असलेल्या अमेरिकेच्या हवाई तळांना लक्ष्य केले जात आहे. नुकताच इराणने इस्त्रायलमध्ये केलेल्या हल्ल्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईंच्या मृत्यूचे पडसाद भारतात, केंद्र सरकार अलर्ट मोडवर

इराणने इस्त्रायलच्या बेतशेमेशमध्ये डागली मिसाईल

इराणने इस्त्रायलच्या जेरूसलेममध्ये असलेल्या बेतशेमेश येथे बॅलेस्टिक मिसाईल डागली. या मिसाईलने बेतशेमेशमध्ये मोठी जीवित आणि वित्त हानी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

इराणच्या हल्ल्यात इस्त्रायलच्या 12 जणांचा मृत्यू

रविवारी (1 मार्च) इराणने इस्त्रायलवर घातक हल्ला केला. या मिसाईलच्या हल्ल्यात 12 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. सोबत अनेक इमारतींचे आणि युद्ध काळातील भुयारी शिबिरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

इराणकडून डागलण्यात आलेल्या मिसाईल आणि ड्रोन इस्त्रायलच्या डेव्हिड स्लिंग, अॅरो आणि इरोण डोम यांनी हवेत नष्ट केले. पण, काही मिसाईल आणि ड्रोन प्रणाली भेदून इस्त्रायलमध्ये कोसळल्या. या हल्ल्यात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts