• Home
  • देश
  • धक्कादायक! खामेनेईंनंतर इराणच्या आणखी एका बड्या नेत्याला मारलं? अमेरिकेने केला ‘हा’ मोठा दावा
Top News

धक्कादायक! खामेनेईंनंतर इराणच्या आणखी एका बड्या नेत्याला मारलं? अमेरिकेने केला ‘हा’ मोठा दावा

iran war 1

America-Iran War | अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराणमध्ये (Iran) जोरदार युद्ध (War) पेटले आहे. अमेरिका-इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khameneni) यांचा मृत्यू झाला. खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता इराणच्या आणखी एका बड्या नेत्याला मारलं असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेने केला आहे.

हेही वाचा – अमेरिका, इस्त्रायल -इराण युद्धाचा भडका, सोने, चांदी भाववाढीचा सामान्यांना फटका

खामेनेईंनंतर इराणचे नवे सर्वोच्च नेते अली रजा अराफी यांचाही मृत्यू?

खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणची जबाबदारी घेण्यासाठी नव्या सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. अली रजा अराफी (Ali Reza Arafi) यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली. तर आता खामेनेईंनंतर इराणचे नवे सर्वोच्च नेते अली रजा अराफी यांनाही हल्ल्यात ठार करण्यात आलं असल्याचा दावा, अमेरिकेने केला आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

अली रजा अराफी यांना ठार करण्यात आल्याचा दावा NSA ने केला आहे. अराफी यांच्या मृत्यूबाबत अमेरिकेने केलेल्या दाव्याबाबत इराणकडून अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाहीये. त्यामुळे खरोखर अली रजा अराफी यांना खरंच ठार करण्यात आले आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, खामनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये संतापाचे वातावरण आहे. तसेच खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणकडून इस्त्रायल आणि आजूबाजूच्या देशात असलेल्या अमेरिकेच्या हवाई तळांना लक्ष्य केले जात आहे. तसेच इराणने इस्त्रायलमध्ये केलेल्या हल्ल्याचे नवीन व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts