Breaking News :
  • Home
  • बिजनेस
  • अमेरिका, इस्त्रायल -इराण युद्धाचा भडका, सोने, चांदी भाववाढीचा सामान्यांना फटका
Top News

अमेरिका, इस्त्रायल -इराण युद्धाचा भडका, सोने, चांदी भाववाढीचा सामान्यांना फटका

Gold and silver prices increase

Gold and silver prices increase : अमेरिका, इस्त्रायलम – इराणध्ये भीषण युद्धाचा भडका उडाला असून सोन्या, चांदीच्या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरीकांना फटका बसताना दिसत आहे. अमेरिका, इस्त्रायलने इराणवर हल्ले केल्यानंतर इराणकडूनही प्रतिहल्ले करण्यात येत आहेत. या भीषण युद्धाचा जगभरात फटका बसताना दिसत आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा सर्वात मोठा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर झालाय. सोनं चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सोनं चांदी खरेदी करणं हे आता सर्वसामान्यांसाठी स्वप्नच उरलंय, असं म्हणायला काही हरकत नाही. सोन्याचांदीच्या दरात एकाच दिवसात झालेली ही वाढ पाहून सराफा बाजारही चक्रावून गेलाय.

हेही वाचा – “ही एका मुलाची आर्त हाक,”; जय पवार यांनी भावनिक पोस्ट करत केली ‘ही’ मागणी

सोन्याच्या दराने आज ऐतिहासिक उसळी घेतली

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात तब्बल 12 हजार रुपयांची वाढ झाली आहे तर दोन दिवसात सोन्याचे भाव 22 हजार रुपयांनी वाढले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याला पसंती दिली आहे. परिणामी, जळगावमध्ये सोन्याच्या दराने आज ऐतिहासिक उसळी घेतली असून, अवघ्या दोन दिवसांत सोन्याचे भाव २२ हजार रुपयांनी वधारले आहेत. शुद्ध सोन्याचा भाव १ लाख ८२ हजार रुपयांवर पोहोचला असून, जीएसटीसह हा आकडा १ लाख ८७ हजार ४६० रुपयांवर गेला आहे. केवळ सोनेच नव्हे, तर चांदीनेही आज सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. चांदीच्या दरात एका दिवसात ७ हजार रुपयांची वाढ होऊन तो ३ लाख रुपयांच्या टप्प्यावर पोहोचला आहे. करांसह चांदीसाठी आता ग्राहकांना ३ लाख ९ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

इराण आणि इस्रायल युद्धाचा जगावर परिणाम

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा फक्त त्यांच्या देशांवरच नव्हे तर संपूर्ण जगावरच परिणाम झालेला दिसत आहे. या युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरातही अस्थिरता निर्माण झाली आहे. दोन्ही धातूंचे दर सध्या चांगलेच वाढताला दिसत आहेत. युद्धाची ही स्थिती जर अशीच कायम राहिली तर येत्या काळात सोनं आणखी महाग होऊन त्याचे भाव गगनाला भिडू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लग्नसराईचे दिवस जवळ येत असतानाच सोन्याच्या दरात झालेल्या या प्रचंड वाढीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचं बजेट पूर्णपणे कोलमडलंय. सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरातील गुंतवणूकदार सोन्याकडं वळत असल्याने ही दरवाढ होत असल्याचं सांगितलं जात आहे.

भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण

युद्धामुळे शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते. युद्धाचा भडका उडाला तर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. सोन्या-चांदीचे दर हे प्रामुख्याने युद्धाच्या बातम्या, अमेरिकन डॉलरची हालचाल आणि जागतिक बँड यील्डवर अवलंबून असतील. जर हा संघर्ष शांत झाला नाही, तर सामान्यांच्या खिशाला सोन्याच्या वाढत्या किमतींचा मोठा फटका बसणार आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण

सराफा बाजारातील जाणकारांच्या मते, जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेली अशांतता आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण यामुळे सोन्याकडे ‘सेफ हेवन’ म्हणून पाहिलं जात आहे. मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोन्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केल्याने ही दरवाढ झाली आहे. आगामी काही दिवसांत जर युद्धाचा तणाव कमी झाला नाही, तर सोन्याचा भाव २ लाखांचा टप्पा सहज ओलांडेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts