Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • युद्धाने हिरावला मुंबईचा मुलगा; ड्रोन हल्ल्यात कांदिवलीच्या दीक्षितचा दुर्दैवी अंत
Top News

युद्धाने हिरावला मुंबईचा मुलगा; ड्रोन हल्ल्यात कांदिवलीच्या दीक्षितचा दुर्दैवी अंत

Dixit Solanki Died In Drone Attack | मागील काही दिवसांपासून अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये चांगलंच युद्ध (War) पेटलं आहे. या युद्धामध्ये तिन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर आता या युद्धाची झळ भारतालाही लागली आहे. धक्कादायक म्हणजे या युद्धामुळे मुंबईचे (Mumbai) मोठे नुकसान झाले आहे. कारण या युद्धात मुंबईतील एका तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – “बाप कशाला काढता…”, विधानभवनात हायव्होलटेज ड्रामा, दोन आमदार एकमेकांना भिडले

ओमानच्या मस्कत किनारपट्टीजवळ असलेल्या गल्फ ऑफ ओमानमध्ये एका मालवाहू ऑईल टँकरवर ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यात मुंबईतील कांदिवली येथीस रहिवासी दीक्षित सोलंकी (Dixit Solanki) (25 वय) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दीक्षित सोलंकी हा ‘MKD Vyom’ या मार्शल आयलंड्स ध्वज असलेल्या ऑईल टँकरवर क्रू मेंबर म्हणून काम करत होता. तर ओमानच्या मस्कत किनारपट्टीच्या सुमारे 52 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या या टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनचा हल्ला झाला. यामुळे भीषण स्फोट होत दीक्षितचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे मुंबईकरांना मोठा धक्का बसला आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts