Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी! अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; VSR कंपनीचा मालक रोहित सिंह लवकरच…
Top News

मोठी बातमी! अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; VSR कंपनीचा मालक रोहित सिंह लवकरच…

Ajit Pawar Plane Crash | 28 जानेवारी 2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान अपघातात (Plane Crash) निधन झाले. या विमान अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. तर अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचा खरचं अपघात होता की घातपात होता? असा सवाल निर्माण केला जात आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दोनदा पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर करत अजितदादांच्या अपघाताबाबत शंका व्यक्त केल्या. तर आज राष्ट्रवादीच्या 20 हून अधिक आमदारांनी अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची भेट घेत अजितदादांच्या अपघाताबाबत संशय असल्याचं म्हटलं.

हेही वाचा  – खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पुत्र मोजतबा खामेनेई यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड

अजित पवारांच्या अपघाताबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांना शंका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 हून अधिक आमदारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये सर्व आमदारांनी DGCA च्या अहवालाबाबत शंका उपस्थित केली. अजित पवारांचा अपघात झाल्यानंतर महिन्याभराने DGCA चा अहवाल समोर आला. तर या अहवालातील त्रुटी दाखवत अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक सवाल आमदारांनी उपस्थित केले. या भेटीदरम्यान सर्व आमदारांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित करत, आपण सर्वांनी मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (CM Devendra Fadnavis) भेट घेऊया अशी विनंती सुनेत्रा पवारांकडे केली. यावर सुनेत्रा पवारांनीही फडणवीसांना भेटण्याचे आश्वासन दिले.

रोहित पवारांकडून VSR कंपनीच्या मालकावर कारवाईची मागणी

दुसरीकडे रोहित पवारांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत VSR कंपनीवर आणि या कंपनीचे मालक रोहित सिंहवर (Rohit Singh) गंभीर आरोप केले. तसेच अजित पवारांचे पुत्र जय पवार (Jay Pawar) यांनीही काही दिवसांपूर्वीच रोहित सिंहचा चालू विमानातील एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये रोहित सिंह पायलटच्या मुख्य सीटवर बसून झोपलेला दिसत होता. हा व्हिडीओ शेअर करत जय पवारांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत सवाल निर्माण केला. या सर्व घडामोडींनंतर रोहित पवार यांनी रोहित सिंहवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली आहे. यादरम्यान, आता एक मोठी माहिती समोर आली आहे.

रोहित सिंह सीयाडीच्या कार्यालयात दाखल

VSR कंपनीचा मालक रोहित सिंह आज पुण्यात दाखल होत तो सीआयडीच्या कार्यालयात पोहोचला आहे. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाबाबत रोहित सिंहची चौकशी केली जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून रोहित सिंह भारत सोडून गेल्याचा दावा केला जात होता. पण आज अचानक रोहित सिंह सीआयडीच्या कार्यालयात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अजित पवार विमान अपघात प्रकरणाची सीआयडी कसून चौकशी करत आहे. तर आता रोहित सिंहची सीआयडीकडून चौकशी केली जात असून आता नवीन काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts