Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Pune

पुण्यात महिला दिनी PMPML ची मोठी घोषणा; महिलांना मिळणार खास गिफ्ट

Women’s Day 2026 | आज जागतिक महिला दिन (Women’s Day 2026)आहे. या खास दिनानिमित्त पुण्यातील (Pune) महिलांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) मोठं गिफ्ट दिलं आहे. महिलादिनी पीएमपीने मोठी घोषणा केली आहे. संपूर्ण पुणे शहरात आज सर्व महिलांना पीएमपीने मोफत प्रवास (PMPML Free Bus Service For Women) करता येणार आहे. त्यामुळे आजच्या या खास दिनी महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – अखेर सुनेत्रा पवार बोलल्या; अजित पवारांच्या अपघात प्रकरणावर केला मोठा खुलासा, म्हणाल्या, पूर्ण अहवाल…

पीएमपीकडून आज पुण्यातील महिलांना दिवसभर मोफत बस सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यातील 31 विशिष्ट मार्गांवर धावणाऱ्या बसमध्ये महिलांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे. पीएमपीच्या या निर्णयामुळे संपूर्ण महिला प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्या आजचा संपूर्ण दिवस फ्रीमध्ये प्रवास करू शकणार आहेत.

पीएमपीसोबत पुणे मेट्रोकडूनही महिलांना खास भेट

विशेष म्हणजे पीएमपीसोबत आता पुणे मेट्रोने (Pune Metro) देखील महिला दिनी महिलांना खास सरप्राइज दिले आहे. महिला दिनीनिमित्त पुणे मेट्रोनेही प्रवासी सेवेत महत्त्वाचा बदल केला आहे. आजपासून मेट्रोच्या प्रत्येक कोचमध्ये महिलांसाठी विशेष राखीव जागा शिल्लक ठेवण्यात येणार आहेत, असा मोठा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. तसेच महिलांसोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी देखील प्रत्येक कोचमध्ये स्वतंत्र जागा ठेवण्यात येणार आहे. मेट्रो प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे महिला प्रवाशांनी स्वागत केले आहे. तसेच पीएमपीसोबत आता पुणे मेट्रोतील प्रवास महिलांसाठी सुखकर होणार आहे.

महिलांना कोणत्या मार्गांवरील बसने करता येणार मोफत प्रवास?

महिलांना काही मोजक्या मार्गांवरून मोफत प्रवास करता येणार आहे. यामध्ये निगडी ते हिंजवडी, भोसरी ते हिंजवडी माण फेज 3, भोसरी ते पिंपरी गाव, निडगी ते भोसरी, चिखली ते डांगे चौक, मनपा भवन ते म्हाळुंगे गाव, पुणे स्टेशन ते कोंढवा, मनपा भवन ते भोसरी, भेकराईनगर ते वाघोली, शेवाळेवाडी ते कात्रज, शेवाळेवाडी ते पिंपळे गुरव, मनपा भवन ते मुकाई चौक किवळे, स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर, कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन, कात्रज ते शिवाजीनगर, मनपा भवन ते वडगाव शेरी, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कात्रज ते कोथरूड डेपो, धनकवडी ते न.ता.वाडी, हडपसर ते वारजे माळवाडी, निगडी ते भक्ती-शक्ती, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते कात्रज, मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव, हडपसर ते मांजरी या मार्गांवर आज महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे.

पीएमपीने दिलेल्या या खास भेटीमुळे महिला प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पीएमपीने आणि मेट्रो प्रशासानाने दिलेल्या खास गिफ्टमुळे आज महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना सुखकर प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts