Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंत! महाराष्ट्र सरकार मुलींना देत आहे १ लाख १ हजार रुपये; जाणून घ्या कोणती योजना
Top News

जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंत! महाराष्ट्र सरकार मुलींना देत आहे १ लाख १ हजार रुपये; जाणून घ्या कोणती योजना

Maharashtra Lek Ladki Yojana

मुलींचे शिक्षण सुरक्षित होण्यासाठी आणि आई वडिलांची भर कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘लेक लाडकी’ योजना सूरू केली आहे. चला तर जाणून घेऊयात कोण आणि कसा लाभ घेऊ शकेल.

महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ‘लेक लाडकी’ योजना आता राज्यभरात जोरात सुरू आहे. या योजनेतून पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना जन्मापासून १८ वर्षापर्यंत एकूण १ लाख १ हजार रुपये थेट बँक खात्यात ५ हप्त्यांमध्ये दिले जातील.

मुख्य उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश मुलींना शिक्षणासाठी संधी देणे आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक पाठिंबा प्रदान करणे आहे. या योजनेअंतर्गत जन्मानंतर, शालेय शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर व १८ वर्ष पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी निधी थेट जमा केला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म महाराष्ट्रात झाला असणे आवश्यक असून, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

अटी कोणत्या आहेत?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म महाराष्ट्रात झाला असणे आवश्यक आहे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
तसेच एका कुटुंबातील फक्त दोन मुलींना योजनेचा लाभ मिळू शकते.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
मुलीचा जन्म दाखला

पालकांचे आधार कार्ड

पिवळा किंवा केशरी रेशनकार्ड

रहिवासी दाखला

बँक पासबुक झेरॉक्स

दुसऱ्या अपत्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र

निधी किती टप्प्यात मिळेल
लेक लाडकी योजनेचा हप्ता हा ५ टप्प्यात मिळणार आहे. कसा ते पाहा खालील प्रमाणे

जन्मानंतर : ५ हजार रुपये (जन्म दाखला व नाव झाल्यानंतर)

पहिली इयत्ता : ६,००० रुपये

सहावी इयत्ता : ७,००० रुपये

अकरावी इयत्ता : ८,००० रुपये

१८ वर्ष पूर्ण झाल्यावर : ७५,००० रुपये (उच्च शिक्षण सुरू असल्याचा दाखला सादर केल्यानंतर)

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts