• Home
  • ताज्या बातम्या
  • Oil Free Puri Recipe: एक थेंबही तेल न वापरता बनवा मऊ-लुसलुशीत पुऱ्या, लगेच नोट करा ‘ही’ सोपी रेसिपी
ताज्या बातम्या

Oil Free Puri Recipe: एक थेंबही तेल न वापरता बनवा मऊ-लुसलुशीत पुऱ्या, लगेच नोट करा ‘ही’ सोपी रेसिपी

Oil Free Puri Recipe

Oil Free Puri Recipe: सण असो किंवा छोटासा कार्यक्रम घरोघरी पुऱ्या ह्या हमखास केला जातात. तळलेल्या पुऱ्या चविष्ट लागतात, पण जास्त तेलामुळे अनेकजण त्या खाणं टाळतात. जर तुम्हाला कमी तेलात किंवा पूर्णपणे ऑईल-फ्री पुऱ्या बनवायच्या असतील हे टिप्स नक्की फॉलो करा.

तळलेल्या पुऱ्या चविष्ट लागतात, पण जास्त तेलामुळे अनेकजण त्या खाणं टाळतात. जर तुम्हाला कमी तेलात किंवा पूर्णपणे ऑईल-फ्री पुऱ्या बनवायच्या असतील तर एअर फ्रायर, ओव्हन किंवा नॉन-स्टिक पॅन वापरून त्या सहज बनवता येतात. योग्य पद्धत वापरली तर या पुऱ्याही छान फुगतात आणि खुसखुशीत होतात. चला तर जाणून घेऊया बनवण्याची सोपी पद्धत

हेही वाचा: Health Tips: तिशीनंतरही नेहमी फिट राहायचंय? मग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा!

 

साहित्य

गव्हाचे पीठ
मीठ
पाणी
आवश्यक असेल तर ओवा
हवं असेल तर रवा

कृती

कणिक मळा
सर्वप्रथम गव्हाचं पीठ एका भांड्यात घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला आणि कोमट पाणी वापरून घट्ट कणीक मळा. कणीक फार मऊ ठेवू नका, कारण मऊ कणकेमुळे पुरी नीट फुगत नाही.

पुरी तयार करण्याची प्रक्रिया
कणकेचे छोटे गोळे करा आणि लाटण्याने छोट्या पुऱ्या लाटा. या लाटलेल्या पुऱ्या काही सेकंद गरम पाण्याच्या वाफेवर ठेवल्या तर त्या आतून थोड्या शिजतात आणि नंतर बेक केल्यावर चांगल्या फुगतात.

एअर फ्रायरमध्ये पुऱ्या
एअर फ्रायर १८०°C वर आधीच गरम करा. नंतर पुऱ्या बास्केटमध्ये ठेवून साधारण ५ ते ७ मिनिटं बेक करा. या पद्धतीने तेलाशिवायही पुऱ्या हलक्या, कुरकुरीत आणि फुगलेल्या तयार होतात.

एअर फ्रायर नसल्यास काय कराल?

जर तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर नॉन-स्टिक तव्यावर पुऱ्या दोन्ही बाजूंनी हलक्या दाबून भाजा. या प्रकाराला बेक्ड पुरी असंही म्हणतात. यामध्ये तेलाची गरज लागत नाही.

पाण्यात पुरी शिजवण्याची वेगळी पद्धत

पुऱ्या बनवण्याची आणखी एक वेगळी पद्धत म्हणजे पाण्यात शिजवणे.

गव्हाचं पीठ मीठ घालून घट्ट मळा.

हवं असल्यास थोडी रवा किंवा जाडसर कणीक घालू शकता, त्यामुळे पुरीला छान टेक्स्चर येतं.

एका मोठ्या पातेल्यात पाणी घ्या आणि ते चांगलं उकळू द्या.

पाणी जोरात उकळू लागल्यावर लाटलेली पुरी सावकाश त्यात सोडा.

सुरुवातीला पुरी तळाशी जाईल, पण काही क्षणात ती वर येऊन पाण्यावर तरंगू लागेल. तेव्हा तिला साधारण एक मिनिट दोन्ही बाजूंनी शिजू द्या.

नंतर पुरी बाहेर काढून सुती कापडावर किंवा जाळीवर ठेवा, जेणेकरून अतिरिक्त पाणी निघून जाईल. नंतर ते मंद आचेवर जाळी ठेऊन भाजा.

अशा पद्धतीने तयार केलेल्या पुऱ्या सणासुदीला किंवा रोजच्या जेवणातही हलक्या आणि आरोग्यदायी पर्याय म्हणून करता येतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts