• Home
  • ताज्या बातम्या
  • Morning Breakfast: खमंग आणि हेल्दी नाश्ता हवाय? 10 मिनिटांत तयार करा गव्हाच्या पिठाचे धिरडे!
Top News

Morning Breakfast: खमंग आणि हेल्दी नाश्ता हवाय? 10 मिनिटांत तयार करा गव्हाच्या पिठाचे धिरडे!

Morning Breakfast 1

Quick Wheat Flour Dhirade: तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी खमंग आणि हेल्दी काहीतरी खाण्याचा विचार करताय का? ज्यामुळे पोट भरल्यासारखं वाटेल आणि दिवसभर फ्रेशही राहाल. तर लगेच लिहून घ्या फक्त 10 मिनिटांत तयार होणारी गव्हाच्या पिठाच्या धिरड्यांची ही सोपी रेसिपी.

सकाळची धावपळ आणि त्यात नाश्त्याचा प्रश्न रोज काय नवीन बनवायचं, हा विचार सगळ्यांनाच पडतो. अशातच जर तुम्हाला खमंग आणि हेल्दी काहीतरी खायचं असेल, ज्यामुळे पोटही भरल्यासारखं वाटेल आणि दिवसभर फ्रेश राहाल, तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. फक्त १० मिनिटात तयार होणारी गव्हाच्या पिठाची खमंग धिरडी आजच ट्राय करा. ही रेसिपी इतकी सोपी आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल.

हेही वाचा: उन्हाळ्यात ऑफिस लुकमध्ये बदल हवा? जिन्स-टॉपऐवजी ट्राय करा हे स्टायलिश आउटफिट्स

हा पदार्थ तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकता आणि ऑफिसला देखील सोबत नेऊ शकता. लगेच नोट करा रेसिपी

साहित्य

गव्हाचं पीठ : १ वाटी
बारीक रवा: अर्धी वाटी
चवीनुसार मीठ
पाणी: दीड वाटी
तेल
जिरे
मोहरी
लसूण
हिरवी मिरची
कांदा
टोमॅटो
शिमला मिरची
गाजर
वाटणे
कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ, मीठ आणि पाणी घालून पातळसर बॅटर तयार करून घ्या. यानंतर कढईत थोडं तेल गरम करून त्यात जिरे आणि मोहरी टाका. मग त्यात लसूण, हिरवी मिरची घालून परतून घ्या. त्यानंतर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजर घालून सर्व भाज्या मंद आचेवर चांगल्या शिजवून घ्या. हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर ते गव्हाच्या बॅटरमध्ये मिसळा आणि वरून कोथिंबीर घाला. आता तवा गरम करून त्यावर तयार बॅटर ओतून पातळ पसरवा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्या. गरमागरम धिरडी चटणी, दही किंवा सॉससोबत सर्व्ह करा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts