Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • धार्मिक
  • Akshaya Tritiya 2026: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? जाणून घ्या सोने-चांदी खरेदीचे शुभ मुहूर्त
ताज्या बातम्या

Akshaya Tritiya 2026: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? जाणून घ्या सोने-चांदी खरेदीचे शुभ मुहूर्त

Akshaya Tritiya

Akshaya Tritiya 2026 Shubh Muhurat for Gold and Silver Purchase: हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीया सण यंदा कधी साजरा केला जाणार आहे? तसेच या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याचा शुभ काळ कोणता आहे, हे आजच्या खास लेखातून जाणून घेऊया

हिंदू कॅलेंडरनुसार अक्षय तृतीय दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीय या दिवशी येते. मात्र इंग्रजी कॅलेंडरनुसार तिची तारीख ही दरवर्षी बदलते. अशी मान्यता आहे की बुधवार आणि रोहिणी नक्षत्रात अक्षय तृतीया आली तर ती अधिक शुभ मानली जाते. पण यंदा अक्षय तृतीया रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी सोने चांदी किंवा इतर वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. चला तर जाणून घेऊयात सोने चांदी खरेदीचा शुभ मुहूर्त काय आहे.

हेही वाचा: Gudi Padwa 2026: या वर्षी गुढी पाडवा कधी आहे? जाणून घ्या महत्त्व आणि परंपरा

शुभ मुहूर्त

सोने-चांदीचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. मात्र तरीही सोने-चांदी खरेदी करण्याचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. त्यामुळे अनेक जण या दिवशी १ ग्रॅम का होईना, सोने खरेदी करतात. यंदा १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी सकाळी १० वाजून ४९ मिनिटांपासून ते २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त राहणार आहे. त्यामुळे सणाच्या दिवशी जवळपास संपूर्ण दिवस खरेदीसाठी शुभ मानला जातो.

अक्षय तृतीयेचे महत्त्व

“अक्षय” किंवा या शब्दाचा अर्थ असा आहे की जे कधीही नष्ट होत नाही किंवा ज्याचा क्षय होत नाही. म्हणून, अशी श्रद्धा आहे की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू किंवा केलेल्या कृती सतत वाढ आणि समृद्धी आणतात.

अक्षय तृतीया ही एक शुभ तिथी मानली जाते जी शुभेच्छा, समृद्धी आणि कीर्ती आणते. या दिवशी खरेदी, जप, यज्ञ, पूर्वजांना प्रार्थना करणे आणि दान करणे हे अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते.

धार्मिक संबंध

अक्षय तृतीयेबद्दल अनेक पौराणिक कथा आणि श्रद्धा प्रचलित आहेत.

ही त्रेता युगाची सुरुवात किंवा तिथीची सुरुवात मानली जाते.

भगवान परशुराम यांचा जन्मही याच दिवशी झाला असे मानले जाते.

अनेक वर्षांनंतर भगवान कृष्ण आणि सुदामा यांची भेट अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली अशीही कथा आहे.

तसेच महाभारत युद्धाची समाप्तीही या दिवशी झाल्याची मान्यता आहे.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts