Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • सतत येणाऱ्या उचकीचा त्रास होतोय? करा ‘हे’ घरच्या घरी सोपे उपाय
लाईफस्टाईल

सतत येणाऱ्या उचकीचा त्रास होतोय? करा ‘हे’ घरच्या घरी सोपे उपाय

Hiccups

Home Remedies for Hiccups: उचकी येणे ही सामान्य गोष्ट आहे, पण जर ती सतत येत असेल तर ही गंभीर बाब ठरू शकते. चला तर पाहू या खास लेखात काही सोपे आणि घरगुती उपाय, ज्यांनी उचकीला त्वरित अराम मिळू शकतो.

उचकी येणे बहुतेक वेळा साधी आणि तात्पुरती समस्या वाटते, पण सतत किंवा दीर्घकाळ ठिकणारी उचकी (persistent hiccups) शरीराच्या इतर समस्या दर्शवू शकते. ही अचानक येणारी धडधडणारी हालचाल डायाफ्राममध्ये ताण निर्माण करते आणि शरीरात अस्वस्थता निर्माण करते. जर तुम्हाला सतत उचकीचा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरू शकते. आजच्या या खास लेखातून आपण जाणून घेणार आहोत. घरच्या घरी (hiccups remedies) सहज करता येणारी सोपी आणि प्रभावी उपाय कोणती, ज्यांनी लगेच उचकी थांबेल (how to stop hiccups) आणि अराम मिळेल.

हेही वाचा: Eid Gifts for Kids: ईडी म्हणून मुलांना द्या हे खास भेटवस्तू, बच्चे कंपनी होतील खुश

उपाय

पाणी प्या
उचकी थांबविण्यासाठी हळूहळू किंवा थोडथोडावेळानी १-२ घोट पाणी प्या. याने डायाफ्रामवर होणारा ताण कमी करते आणि उचकीला आराम मिळतो.

मोठा श्वास घ्या
सतत उचकी येत असल्यास, दीर्घ श्वास घ्या आणि तो 10–15 सेकंद धरून ठेवा. हे 2–3 वेळा करा. अशा प्रकारे तुमच्या डायाफ्रामला आराम मिळतो आणि उचकी थांबण्यास मदत होते.

लिंबाचा तुकडा
अर्धा लिंबाचा तुकडा चिवडा किंवा थोडेसे आंबट पदार्थ खा. लिंबामध्ये असलेली आम्लता डायाफ्रामला आराम देते आणि उचकी थांबते.

मध किंवा साखर
एक चमचा मध किंवा साखर खा. मध किंवा साखर गळ्याच्या स्नायूंवर काम करून उचकी थांबवते.

डॉक्टरांचा सल्ला
जर तुमची उचकी २४ तासांपेक्षा जास्त होत असेल किंवा तुम्हाला छातीत दुखणे, सतत अशक्तपणा, किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप:
ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. याला वैद्यकीय सल्ला मानू नका. उचकी दीर्घकाळ टिकत असल्यास किंवा त्रास वाढत असल्यास, त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts