Breaking News :
  • Home
  • देश
  • पत्नीशी बोलत असतानाच फोन कट आणि होत्याचं नव्हतं झालं; सौदी अरेबियात भारतीय तरुणासोबत नेमकं काय घडलं
Top News

पत्नीशी बोलत असतानाच फोन कट आणि होत्याचं नव्हतं झालं; सौदी अरेबियात भारतीय तरुणासोबत नेमकं काय घडलं

ravi gopal death

indian Youth Dies in Riyadh, Saudi Arabia : इराण-इस्राईल (iran-israiel-america war) व अमेरिका युद्धाचा फटका अनेकांना बसत आहे. त्यामुळे भारतीय तरुणांनाही (indian youth dies) आपल्या जीवास मुकावे लागत आहे. अशीच एक घटना समोर आली असून पत्नीशी बोलत असतानाच क्षेपणास्त्र अंगावर पडल्याने सौदी अरेबियात रियाधमध्ये भारतीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रवी गोपाल (ravi gopal) (२६) असे मृत्युमुखी पडलेल्या भारतीय तरुणाचे नाव आहे. तो सौदी अरेबियाला रोजगारासाठी गेला होता. मात्र, या घटनेला काही दिवस उलटूनही रवीचा मृतदेह अद्याप भारतात न परतल्याने त्याचे कुटुंब हतबल झाले आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील (up) सीतापूर जिल्ह्यातील (sitapur district) बाघैन गावातील (baghain gaon) रहिवाशी आहे.

 

हे ही वाचा: रुपाली चाकणकरांना अटक होणार? की त्यांना वाचवणार?

बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अवशेषांच्या तडाख्यात सापडला

१८ मार्च रोजी नेहमीप्रमाणे रवी कामावरून परतला. रात्री ८:२० च्या सुमारास पत्नी रितूशी तो फोनवर बोलत होता. दोघांच्या गप्पा सुरू असतानाच, रात्री ९:५३ वाजता अचानक रितूला फोनवर एका प्रचंड स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यानंतर काही क्षणातच फोन कट झाला. रितूने वारंवार प्रयत्न करूनही रवीचा फोन लागला नाही. दुसऱ्या दिवशी रवीच्या मित्राने त्याच्या निधनाची धक्कादायक बातमी दिली.

जागीच मृत्यू

सौदी अरेबियाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रियाधला लक्ष्य करणारी चार इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पाडली होती. या क्षेपणास्त्रांचे अवशेष शहराच्या दक्षिणेकडील रिफायनरी जवळ पडले. या पडणाऱ्या अवशेषांच्या तडाख्यात सापडल्याने रवीचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कुटुंबाचा आधार गमावला

रवी गोपाल हा आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. सप्टेंबर २०२० मध्ये रितूशी त्याचे लग्न झाले होते. त्यानंतर तो उदरनिर्वाहासाठी सौदीला गेला होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि एक चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. घराचा आधारस्तंभ गेल्याने हे कुटुंब आता उघड्यावर पडले आहे.

अद्याप कोणतीही ठोस मदत नाही

रवीच्या कुटुंबाने आरोप केला आहे की, इतकी मोठी दुर्घटना होऊनही सरकार किंवा संबंधित दूतावासाकडून त्यांना अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे, त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. पण आम्हाला फक्त आमचा मुलगा शेवटचा पाहायचा आहे. त्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी कोणीही ठोस पाऊल उचलताना दिसत नाहीये, अशी भावना रवीच्या वडिलांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts