Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Summer Vacation Tips: मुलांसोबत समर व्हेकेशन प्लॅन करताय? ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा
Top News

Summer Vacation Tips: मुलांसोबत समर व्हेकेशन प्लॅन करताय? ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Summer Vacation trip

Summer Vacation Tips: उन्हाळी सुट्टी सुरू होताच प्रवासाची मजा सर्वांवर हावी होते. काही लोक सोलो ट्रिपला निघतात, तर काही कुटुंबासोबत गप्पा मारत आणि निसर्गाचा आनंद घेत प्रवास करतात. जर तुम्ही देखील यंदा मुलांसोबत वेळ घालवण्याचा विचार करत असाल तर या महत्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होताच मुलांच्या उत्साहाची उधळण सुरू होते. ‘आई, चला फिरायला जाऊ!’ किंवा ‘बाबा, चला ना!’ असे आनंदी आवाज घरभर ऐकू येतात. अशा वेळी मुलांना काय बोलावं काहीच कळत नसते. काही पालकांना ऑफिसमधून सुट्टी मिळत नाही तर काहींना आर्थिक अडचणीमुळे मुलांना नाही म्हणावे लागते. पण जर तुम्ही यंदा मुलांच्या आनंदासाठी प्रवासाची योजना करत असाल, तर या महत्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

 

उन्हाळ्याची सुट्टी मुलांसाठी फक्त सुट्टी नसते, तर नवीन अनुभव आणि शिकण्याची संधी असते. अभ्यासापासून थोडी विश्रांती मिळाल्यानंतर विविध खेळ, ऍक्टिव्हिटी आणि प्रवास मुलांच्या विकासासाठी फायद्याचे ठरतात आणि कुटुंबातील नाते अधिक घट्ट करतात. पण योग्य नियोजनाशिवाय हा अनुभव थोडा तणावदायक होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक गोष्ट आधीच ठरवून ठेवणे महत्त्वाचे असते.

योग्य ठिकाण निवडा

मुलांच्या वय आणि आवडीचा विचार करून स्थळ निवड. छोट्या मुलांसोबत शांत ठिकाणे, प्लेग्राउंड किंवा निसर्गाच्या जवळचे ठिकाण उत्तम ठरेल, तर मोठ्या मुलांसोबत अ‍ॅडव्हेंचर किंवा शैक्षणिक ट्रिपचा विचार करू शकता.

प्रवासाची पूर्वतयारी

कुठे आणि कसे जाणार, राहण्याची सोय आधीच निश्चित करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवास अधिक आरामदायी होईल.

सुरक्षा

मुलांसोबत प्रवास करताना सुरक्षा खूप महत्वाची आहे. डिपेंड की तुम्ही कोणत्या ठिकाणी फिरायला जात आहे. या नुसार कपडे, मेडिकल किट, मुलांचे औषधे आणि काही अ‍ॅलर्जीच्या गोष्टी लक्षात ठेवा.

वेळेचे व्यवस्थापन

लांबच्या प्रवासात मुलांसोबत वेळेचे नियोजन करा. प्रवास दरम्यान छोट्या विश्रांतीच्या थांबण्यांमुळे मुलं ताजेतवानी राहतील. जेवण, पाणी आणि विश्रांतीसाठी वेळ निश्चित ठेवा.

मुलांच्या आवडीचा विचार

मुलांसोबतचा प्रवास मजेदार बनवण्यासाठी त्यांच्या आवडीचे खेळ, निसर्गातील अनुभव आणि सैर-सपाटी समाविष्ट करा. त्यामुळे मुलं अधिक उत्साही राहतील.

या वस्तू ठेवा जवळ

मुलांना आवडीच्या वस्तू जवळ ठेवा. जसे की स्नॅक्स, फळे किंवा इतर आवश्यक वस्तू

 

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts