Indian Air Force Personnel Spies for Pakistan : ज्याच्यासमोर केवळ पैसे कमावणे हे एकमेव उद्दिष्ट असते तो माणूस पैशांसाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो, याचे उदाहरण समोर आले आहे. सरकारी नोकरी असतांनाही, याला काय म्हणाल….! पैशांच्या मोबदल्यात एका भारतीय वायुसेनेच्या कर्मचाऱ्याने (Indian Air Force personnel) पाकिस्तानसाठी (pakistan) हेरगिरी केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा: युद्धाचा फटका एअर इंडियाला; ७० टक्के विमानांची उड्डाणे रद्द
पाकिस्तानी हँडलर्सना गुप्त माहिती पुरवली
राजस्थान इंटेलिजन्स (Rajasthan Intelligence) आणि एअरफोर्स इंटेलिजन्सने (Air Force Intelligence) संयुक्त कारवाई करत आसाममधील चबुआ वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या सुमित कुमार (३६) (Sumit Kumar) या सिव्हिल कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
पुरवत होता गुप्त माहिती
आरोपी सुमित हा पैशांच्या मोबदल्यात लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्र प्रणालीची गुप्त माहिती पाकिस्तानी हँडलर्सना पुरवत होता.
चौकशीतून सुमित कुमारचे नाव समोर
या प्रकरणाची पाळेमुळे जानेवारी २०२६ मध्ये जमिडसळमेरमध्ये सापडली होती. राजस्थान पोलिसांनी झाबरा राम नावाच्या एका संशयिताला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून सुमित कुमारचे नाव समोर आले.
चबुआ येथून ताब्यात
तेव्हापासून गुप्तचर यंत्रणा सुमितवर पाळत ठेवून होत्या. खात्री पटल्यानंतर त्याला आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यातील चबुआ येथून ताब्यात घेऊन जयपूरला आणण्यात आले.
चौकशीत धक्कादायक खुलासे
प्रयागराजचा असलेला सुमित कुमार आसाममधील चबुआ एअरफोर्स स्टेशनवर मल्टी-टास्किंग स्टाफ म्हणून कार्यरत होता. चौकशीत त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात
सुमित २०२३ पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होता. त्याने चबुआ आसाम आणि नाल बिकानेर येथील वायुसेना तळांची महत्त्वाची माहिती लीक केली. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
विशेष पोलीस ठाण्यात गुन्हा
दरम्यान, आरोपी सुमित कुमारवर २२ मार्च रोजी जयपूर येथील विशेष पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी त्याला रीतसर अटक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रफुल्ल कुमार यांनी दिली.
लष्करी तळांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात
तपास यंत्रणांच्या मते, हा देशव्यापी हेरगिरीच्या नेटवर्कचा एक भाग आहे. पाकिस्तानी हँडलर्स विशेषतः लष्करी तळांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढत आहेत. सुमित कुमारने नेमकी किती माहिती आणि किती पैशांच्या बदल्यात विकली, याचा अधिक तपास आता सेंट्रल इंटरोगेशन सेंटरमध्ये सुरू आहे.
प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे:
आरोपी: सुमित कुमार, हा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून, तो आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यातील चबुआ एअर फोर्स स्टेशनवर मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) म्हणून काम करत होता.
कारवाई: राजस्थान इंटेलिजन्स आणि एअरफोर्स इंटेलिजन्सने ही संयुक्त कारवाई केली असून, संशयित जानेवारी २०२६ पासून रडारवर होता.
हेरगिरीचा प्रकार: आरोपी २०२३ पासून पाकिस्तानी हेरगिरी एजंट्सच्या संपर्कात होता आणि पैशांसाठी एअर फोर्स तळाची अत्यंत संवेदनशील माहिती शेअर करत होता.
तपास: अधिक चौकशीसाठी त्याला जयपूरला आणले असून, या प्रकरणाशी संबंधित व्यापक नेटवर्कचा तपास सुरू आहे.












