Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Ram Navami 2026: यंदा २६ की २७ मार्च रामनवमी कधी आहे? वाचा शुभ मुहूर्त अन् पूजा विधी
Top News

Ram Navami 2026: यंदा २६ की २७ मार्च रामनवमी कधी आहे? वाचा शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

Ram Navavmi 2026

Ram Navami 2026 Date: हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेली राम नवमी चैत्र महिन्यातील शुल्क पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. चला तर जाणून घेऊयात यंदा रामनवमी कधी साजरी केली जाणार आहे आणि शुभ मुहूर्त काय आहे.

राम नवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण मानला जातो. हा दिवस भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा म्हणून साजरा केला जातो. वैदिक पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुल्क पक्षातील नवमी तिथीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. यंदा हा दिवस २६ मार्च २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे.

हेही वाचा: बंगळुरूमध्ये घर भाड्याने शोधताय? फॅमिली डिटेल्स ते सॅलरी स्लिपची मागणी, वाचा नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

हिंदू पौराणिक कथांनुसार, त्रेतायुगात भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला. त्यांच्या आदर्श जीवनातून सत्य, कर्तव्य आणि नीतिमूल्यांचा संदेश दिला जातो.

तिथी आणि पूजा मुहूर्त

२०२६ मध्ये चैत्र शुल्क नवमी तिथी २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी सुरू होईल आणि पुढील दिवशीही कायम राहील. त्यामुळे काही ठिकाणी २७ मार्चलाही पूजा केली जाऊ शकते. रामनवमीच्या दिवशी मध्यान्ह काळाला विशेष महत्व दिले जाते, कारण याच वेळी भगवान रामांचा जन्म झाला असे मानले जाते.

पूजा मुहूर्त: सकाळी ११:१५ ते दुपारी १:४३
मध्यान्ह क्षण: दुपारी १२:२९

उपवासाची पद्धत

या दिवशी अनेक भक्त उपवास पाळतात. काही जण पूर्ण दिवस उपवास करतात, तर काही जण एकदाच सात्त्विक भोजन घेतात.

फळे, दूध, दही यांसारखे हलके पदार्थ सेवन केले जातात
कांदा-लसूण टाळले जाते
सैंधव मिठाचा वापर केला जातो

चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी कन्या पूजन (कंजक पूजा) केली जाते.

प्रसाद आणि पारंपरिक पदार्थ

रामनवमीच्या निमित्ताने घराघरात साधे पण सात्त्विक पदार्थ तयार केले जातात:

उकडलेले काळे चणे
रव्याचा शिरा (हलवा)
पुरी
खीर
दही भल्ला
हे सर्व पदार्थ भगवान श्रीरामांना अर्पण करून नंतर प्रसाद म्हणून वाटले जातात.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts