Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • बंगळुरूमध्ये घर भाड्याने शोधताय? फॅमिली डिटेल्स ते सॅलरी स्लिपची मागणी, वाचा नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया
Top News

बंगळुरूमध्ये घर भाड्याने शोधताय? फॅमिली डिटेल्स ते सॅलरी स्लिपची मागणी, वाचा नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

Rent Home

Bangalore Rent Issues: सध्या सोशल मीडियावर बेंगळुरूमधील एका विचित्र प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. एका घरमालकाने घर दाखवण्यापूर्वीच इतक्या अटी घातल्या की लोक म्हणू लागले – ‘घर घ्यायचंय की जॉब जॉइन करायचाय?

आजकल घर भाड्याने घेणं दिसायला जितकं सोपं वाटतं, तितकंच ते प्रत्यक्षात कठीण झालं आहे. पूर्वी लोक फक्त लोकेशन, भाडं आणि घराची स्थिती पाहून निर्णय घेत असत. पण आता मोठ्या शहरांमध्ये घर मिळवणं म्हणजे जणू एखादी परीक्षा पास करावी लागते.

हेही वाचा: Nora Fatehi: ‘या’ कारणाने नोरा फतेहीला सोडावं लागणार भारत; कामाचा परवाना रद्द होण्याची शक्यता, नेमकं काय प्रकरण आहे?

बेंगळुरूमध्ये भाड्याने घर शोधणं आता फक्त जागा आणि बजेटपूरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते एक प्रकारचं स्क्रीनिंग प्रोसेस’ बनत चाललं आहे. अलीकडेच समोर आलेल्या एका प्रकरणामुळे लोक हैराण झाले आहेत. चला तर जाणून घेऊयात नेमका काय प्रकरण आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

एका घरमालकाने संभाव्य भाडेकरूंना घर दाखवण्याआधीच अनेक अटी घातल्या. त्या अटी इतक्या अनोख्या होत्या की सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली.

व्हॉट्सअॅप चॅटमुळे उडाली खळबळ

हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा एका यूजरने Reddit वर व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला. यात घरमालकाने स्पष्ट केलं होतं की, फ्लॅट पाहण्यापूर्वीच काही अटी पूर्ण कराव्या लागतील.

घर पाहण्याआधी फोटो-व्हिडिओची मागणी

घर पाहण्याआधीच भाडेकरूंना त्यांच्या सध्याच्या राहत्या घराचे फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास सांगितले गेले. म्हणजेच, तुमची राहणीमान कशी आहे हे सिद्ध केल्याशिवाय पुढीची प्रक्रिया सुरू होत नाही.

वैयक्तिक माहितीची सविस्तर मागणी

याशिवाय, घरमालकाने पगाराची माहिती, पोलिस पडताळणी, कुटुंबातील सदस्यांचे तपशील, त्यांच्या नोकऱ्या आणि सध्याचे घर का सोडत आहात यासारखे प्रश्न विचारले. साधारणपणे ही माहिती कराराच्या वेळी दिली जाते, पण येथे सुरुवातीलाच सर्व तपशील मागण्यात आले.

प्रायव्हसीवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पडताळणी योग्य असल्याचं मान्य केलं, पण इतक्या खोलात जाऊन माहिती मागणं चुकीचं असल्याचं सांगितलं. अनेकांनी याला वैयक्तिक आयुष्यातील हस्तक्षेप म्हटलं.

सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया

या प्रकरणावर नेटिझन्सनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या:

“घर घ्यायचंय की इंटरव्ह्यू द्यायचा आहे?”
“आता CV आणि रेफरन्सेसही द्यावे लागतील बहुतेक!”
“हे भाड्याचं घर नाही, थेट व्हिसा प्रोसेस वाटते!”

या सगळ्या चर्चेमुळे बेंगळुरूमधील घरभाड्याच्या बदलत्या ट्रेंडकडे पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts