Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

भारतीय वायू सेनेचे ‘कॅपिटल बजेट’…! काय आहे मेगा प्लॅन

air sena

Indian Air Force’s ‘Capital Budget’ : २०२६-२७ पर्यंत अनेक मोठे आणि महत्त्वाचे संरक्षण करार (Protection Agreement) करण्यात येणार आहेत. त्यासाठी भारतीय वायू सेनेने एक मोठे पाऊल उचलले आहे. सरंक्षण मंत्रालयाच्या संरक्षण विषयक संसदीय स्थायी समितीलाही (Parliamentary Standing Committee on Defence) माहिती दिली आहे. त्यामुळे आकाशात भारताची ताकद वाढणार आहे. यामध्ये 114 मल्टी-रोल फायटर एअरक्राफ्ट (Multi-role fighter aircraft) (संभाव्य राफेल), 60 मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट (MTA) आणि प्रगत AEW&C यांसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्यासाठी गत वर्षाच्या तुलनेत यावेळी भारतीय वायुसेनेच्या ‘कॅपिटल बजेट’मध्ये 37.03 टक्के इतकी ऐतिहासिक वाढ करण्यात आली आहे.

हे ही वाचा: …तर भारत इंधनाबाबत होईल स्वावलंबी; ओएनजीसीचा कुठला आहे महाकाय प्रकल्प?

37.03 टक्के इतकी ऐतिहासिक वाढ

गत वर्षाच्या तुलनेत यावेळी भारतीय वायुसेनेच्या ‘कॅपिटल बजेट’मध्ये 37.03 टक्के इतकी ऐतिहासिक वाढ करण्यात आली आहे. या निधीचा उपयोग केवळ जुन्या देणी फेडण्यासाठीच नव्हे, तर भविष्यातील उच्च-तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी, जसे की कॉम्बॅट एनेबलर्स, मीडियम-एल्टिट्यूड लाँग-एंड्युरन्स RPA (रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट) आणि नवीन फायटर जेट्स खरेदीसाठी केला जाणार आहे.

फायटर एअरक्राफ्ट खरेदीस मंजुरी

यावर्षी फेब्रुवारीमध्ये संरक्षण अधिग्रहण परिषद (DAC) ने 114 मल्टी-रोल फायटर एअरक्राफ्ट (MRFA) खरेदीस मंजुरी दिली आहे. या प्रचंड कराराची अंदाजित किंमत सुमारे 3.25 लाख कोटी रुपये आहे. मेक इन इंडिया हे विमान फ्रान्सच्या ‘डसॉल्ट एव्हिएशन’ कंपनीकडून एका भारतीय भागीदारासोबत भारतातच तयार केले जाणार आहेत.

वायुसेनेचे तांत्रिक उन्नतीकरण

रणनीतिक महत्त्व: सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीचा विचार करता, समितीने वायुसेनेला तांत्रिक उन्नतीकरण आणि आधुनिक शस्त्रसामग्री खरेदीत या निधीचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले आहे.

60 नवीन मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची योजना

वायुसेनेच्या जुन्या झालेल्या An-32 विमानांच्या ताफ्याला बदलण्यासाठी 60 नवीन मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची योजना मंजूर करण्यात आली आहे. सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पात फ्लाय-अवे: 12 विमाने थेट तयार अवस्थेत खरेदी केली जातील.

स्वदेशी निर्मिती: उर्वरित 48 विमानांचे उत्पादन देशातच केले जाईल.

प्रमुख दावेदार: या स्पर्धेत एम्ब्रेयर C-390 मिलेनियम, लॉकहीड मार्टिन C-130J सुपर हरक्युलिस आणि एअरबस A-400M यांसारखी प्रगत विमाने आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts