Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • अजित पवारांच्या घराबाहेर खरातने केली काळी जादू? रोहित पवारांनी व्यक्त केला संशय, म्हणाले, दादांची ताकद जावी म्हणून…
Top News

अजित पवारांच्या घराबाहेर खरातने केली काळी जादू? रोहित पवारांनी व्यक्त केला संशय, म्हणाले, दादांची ताकद जावी म्हणून…

rohit pawar 5
75

Rohit Pawar | सध्या संपूर्ण राज्यात नाशिकच्या (Nashik) अशोक खरात प्रकरणामुळे (Ashok Kharat Case) एकच खळबळ उडाली आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे (Ashok Kharat) पितळ उघडे पडले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ढोंगी ज्योतिषी अशोक खरात हा नाशिकमध्ये खूपच प्रसिद्ध होता. त्याचे राजकीय नेते, बडे उद्योजक आणि सेलिब्रिटी यांच्यासोबत चांगले संबंध होते. तर या ढोंगी खरातचा खरा चेहरा आता समोर आला असून नाशिकसह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – नाव बदललं, गणितात नापास…, भोंदूबाबा खरातचा दहावीचा निकाल व्हायरल, मार्कशीटने फोडला भांडाफोड

अशोक खरातबाबत काय म्हणाले रोहित पवार?

अशोक खरातने अनेक महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केला आहे. खरातला अटक केल्यापासून त्याच्यावर आत्तापर्यंत 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशातच आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर खरातच्या माध्यामातून काळी जादू केली असल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, जेव्हा अजितदादा जिवंत होते तेव्हा बारामतीतील त्यांच्या घराबाहेर काळी जादू करण्यात आल्याचं समोर आलं होतं. बारामतीतील घरासोबतच मुंबईतील त्यांच्या देवगिरी बंगल्याबाहेरही अशीच काळी जादू झाली होती. तर अजितदादांच्या पक्षात असे बरेच नेते आहेत ज्यांच्या करंगळीला कुठेतरी कापलं होतं, कोणाच्या अंगठ्याला कापलं आहे. ही लोकं त्या ठिकाणी नेमकं काय करतात त्यांनाच माहिती.

रोहित पवारांनी काय संशय व्यक्त केला?

अजितदादा जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांच्या घराबाहेर काळी जादू केली जात होती. कदाचित नाशिकचा भोंदूबाबाच्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर ही काळी जादू किंवा अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पक्षावर आपला कंट्रोल यावा यासाठी ती पूजा किंवा काळी जादू करण्यात आली होती का? कारण दादांच्या घराबाहेर काळी जादू करण्याचा प्रकार झाल्यानंतर 28 तारखेला अजितदादांचा अपघाता झाला की घातपात झाला? याचा शोध आम्ही घेत आहोतच, असं रोहित पवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, अजितदादांच्या घराबाहेर काळी जादू करण्यामध्ये कोण कोण त्या ठिकाणी अडकलेलं आहे? अजितदादांची ताकद जावी आणि त्यांच्याकडे ती ताकद यावी यासाठी कोणी कोणी असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे? यामागे काय हेतू होता का? अशा शंका रोहित पवारांनी उपस्थित केल्या आहेत. रोहित पवारांनी या शंका उपस्थित केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts