Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
ताज्या बातम्या

भारतातील कुठले शहर आहे आइस्क्रीम कॅपिटल? जाणून घ्या

ice cearm

ice-cream capital Mangaluru : उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अंगाच्या लाहीलाहीला शांत करण्यासाठी अनेकजण शीतपेयाकडे (Cold Drinks) वळतात. एवढेच नाही तर अनेक लोकांची पावले आइस्क्रीम पार्लरकडे (ice-cream parlour) वळताना दिसत आहेत. विविध फ्लेवर्स (flavours)  आज आइस्क्रीमचे मिळत आहेत. आइस्क्रीम खरेदी करण्यासाठी झुंबड उडताना दिसत आहे. परंतु आपल्या देशातील कुठले शहर आहे, आइस्क्रीम कॅपिटल…माहीत आहे का? त्या शहराबद्दल जाणून घेऊ या.

हे ही वाचा: भारताचा तिसरा सॅटेलाइट लॉन्च सेंटर? जाणून घ्या कुठे असेल हा स्पेसपोर्ट

आइस्क्रीम खाणाऱ्या लोकांची संख्या वाढतेय

आता उन्हाळा आहे म्हणून मोठ्या प्रमाणात आइस्क्रीम खातात असे नाही, आजकाल कुठल्याही मौसममध्ये आइस्क्रीम खाल्ले जाते. त्यामुळे आइस्क्रीम खाणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र कर्नाटकतील मंगळुरु शहर हे भारतातील आइस्क्रीम कॅपिटल म्हणून ओळखले जाते. मंगळुरुमध्ये आइसक्रीमची परंपरा अनेक दशकांपासून आहे. येथे जुन्या, पारंपरिक आइसक्रीम पार्लरपासून ते आधुनिक आणि प्रीमियम ब्रँड्सपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत.

फ्युजन प्रकारचे आइसक्रीम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध

दरम्यान, स्थानिक लोकांमध्ये आइस्क्रीम खाण्याची सवय वाढताना दिसत आहे. ती सवय एक दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली आहे. या शहरात वेगवेगळ्या चवींचे, नवीन प्रयोगांचे आणि फ्युजन प्रकारचे आइसक्रीम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळेच पर्यटकांनाही चेन्नईतील आइसक्रीम संस्कृतीचा अनुभव घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे लोकांची पावले आइस्क्रीमच्या दुकानांकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत.

मंगळुरूच्या खाद्यसंस्कृतीचा भाग

मंगळुरु हे आइस्क्रीमचे शहर म्हणून आताच उदयाला आलेले नाही. तर गेल्या कित्येक वर्षांपासून मंगळुरु हे शहर खास आइस्क्रीमसाठी प्रसिद्ध झाले आहे. आईस्क्रीम हे जवळजवळ एक शतकापासून मंगळुरूच्या खाद्यसंस्कृतीचा भाग बनलेले आहे. मंगळुरुचे आइस्क्रीम हे ट्रेड सेटिंगमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतात.

२० व्या शतकाच्या सुरुवातीला मंगळुरुमध्ये आले आईस्क्रीम

२० व्या शतकाच्या सुरुवातीला, वसाहतकालीन खाद्य सवयींच्या प्रभावामुळे आईस्क्रीम मंगळुरूमध्ये आले. पण स्थानिकांनी ते किती लवकर स्वीकारले आणि त्यात बदल घडवले, हीच या शहराची खासियत होती.

 

तिथल्या स्थानिक आइस्क्रीमची ओळख ही जगभरातील ट्रेंडसवर आधारीत ठरते. त्यामुळेच इथल्या आइस्क्रीममध्ये एक वेगळेपणा जाणवतो. मुख्य म्हणजे मंगळुरुच्या स्थानिक ब्रँड्सनी अनेक वर्षे आपले वर्चस्व टिकवून ठेवले असून, त्यांनी ग्राहकांच्या आवडीनुसार सातत्याने नवे प्रकार सादर केले आहेत.

मंगळुरूच्या आईस्क्रीम उद्योगाची मुख्य वैशिष्ट्ये:

प्रसिद्ध ब्रँड्स: Ideal Ice Cream, Pabba’s, Hangyo आणि Rayan हे येथील प्रमुख ब्रँड आहेत.

Signature Taste: ‘गडबड’ ही सर्वात प्रसिद्ध आईस्क्रीम आहे, जी एका उंच ग्लासमध्ये विविध फ्लेवर्स, फळे आणि सुकामेवा घालून दिली जाते.

संस्कृती: येथे आईस्क्रीम फक्त गोड पदार्थ नसून एक संस्कृती आहे, जी जवळपास १०० वर्षांपासून चालत आलेली आहे.

मुख्य ठिकाणे आणि उत्पादने:

Ideal Ice Cream: प्रभाकर कामत यांनी १९७५ मध्ये स्थापन केलेली ही कंपनी स्थानिक बाजारात सुमारे ८० टक्के हिस्सा आहे.

इतर ठिकाणे: FruitPopz आणि Dallas यांसारखी नवीन ठिकाणे त्यांच्या फ्यूजन आईस्क्रीमसाठी लोकप्रिय होत आहेत.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts