Hanuman Jayanti 2026: यंदा २ एप्रिल २०२६ रोजी प्रभू श्रीरामाचे परम भक्त हनुमानाची जयंती आहे. जर तुम्हाला या दिवशी बजरंगबलींचा विशेष आशीर्वाद हवा असेल किंवा मनोकामना पूर्ण व्हावी अशी इच्छा असेल, तर या गोष्टी लक्षात ठेवा.
दरवर्षी प्रमाणे यंदाही चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला (२ एप्रिल २०२६ ) हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी बजरंगबलींची विधीपूर्वक पूजा केल्यास विशेष कृपा प्राप्त होते. जर तुम्हाला या दिवशी बजरंगबलींचा विशेष आशीर्वाद हवा असेल किंवा मनोकामना पूर्ण व्हावी अशी इच्छा असेल, तर आजच्या लेखातील या गोष्टी लक्षात ठेवा.
हनुमान जयंतीचे महत्व
यंदा २ एप्रिल २०२६ हनुमान जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, याच दिवशी संकटमोचन हनुमानांचा जन्म झाला. त्यामुळे देशभरात हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो.
हेही वाचा: रोज वर्कआउटची सवय लावायची आहे? फिटनेस ट्रेनरच्या या 3 सोप्या ट्रिक्स करून पाहा
मंगळवार आणि हनुमानजींचा संबंध
हनुमानजींचा जन्म मंगळवारी झाला होता. त्यामुळे प्रत्येक मंगळवारी त्यांची विशेष पूजा केली जाते. तसेच शनिवारही त्यांना प्रिय मानला जातो. त्यांचे वडील केसरी आणि आई अंजनी होत्या.
हनुमानजींना भगवान शिवांचा ११ वा रुद्र अवतार मानले जाते. त्यांना बल, बुद्धी आणि विद्या देणारे देव मानले जाते. त्यांच्याकडे अष्टसिद्धी आणि नवनिधी असल्याचे सांगितले जाते.
हनुमान जयंती तिथी
हिंदू पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी १ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून ८ मिनिटांनी सुरू होईल आणि २ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून ४१ वाजेपर्यंत राहील. उदया तिथीनुसार हनुमान जयंती २ एप्रिललाच साजरी केली जाईल.
या गोष्टी ठेवा लक्षात
सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन वस्त्र परिधान करा
घर आणि पूजास्थळ स्वच्छ ठेवा
हनुमानजींना सिंदूर, फुले आणि नैवेद्य अर्पण करा
तेलाचा दिवा लावून शांतपणे प्रार्थना करा
हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड वाचा
बजरंगबलींना प्रसन्न करण्यासाठी सोपे उपाय
मंगळवार किंवा शनिवार उपवास करा
गरजू लोकांना अन्नदान करा
मंदिरात जाऊन दर्शन घ्या
मनापासून “राम” नामाचा जप करा
राशीनुसार मंत्र
मेष – ॐ सर्वदुःखहराय नमः
वृषभ – ॐ कपिसेनानायक नमः
मिथुन – ॐ मनोजवाय नमः
कर्क – ॐ लक्ष्मणप्राणदात्रे नमः
सिंह – ॐ परशौर्य विनाशन नमः
कन्या – ॐ पंचवक्त्र नमः
तूळ – ॐ सर्वग्रह विनाशिने नमः
वृश्चिक – ॐ सर्वबन्धविमोक्त्रे नमः
धनु – ॐ चिरंजीविते नमः
मकर – ॐ सुरार्चिते नमः
कुंभ – ॐ वज्रकाय नमः
मीन – ॐ कामरूपिणे नमः







