Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • भारताची आरोग्य क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी; माता मृत्यूदरात ८० टक्क्यांची घट
Top News

भारताची आरोग्य क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी; माता मृत्यूदरात ८० टक्क्यांची घट

maritual rate

Maternal Mortality Rate : भारताने आरोग्य क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करत एक नवीन उंची गाठली आहे. १९९० च्या तुलनेत २०२३ पर्यंत देशातील माता मृत्यूदरात ८० टक्क्यांची घट नोंदवली गेली. १९९० मध्ये प्रति १ लाख जन्मांमागे ५०८ असलेला हा दर २०२३ मध्ये ११६ वर खाली आला आहे. ‘द लॅन्सेट’ (The Lancet) या वैद्यकीय नियतकालिकात (Medical Journal) हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. दरम्यान, जगभरात १९९० च्या तुलनेत माता मृत्यूचे प्रमाण एक तृतीयांशने कमी झाले आहे.

हे ही वाचा: पाकिस्तानच्या कुठल्या दहशतवादी संघटनांकडून भारताला धोका? अमेरिका काँग्रेस संशोधन युनिटचा अहवाल काय सांगतोय?

अनेक योजना

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यात आयुष्मान भारत, डिजिटल मिशन, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, आयुष्मान आरोग्य मंदिर (पूर्वीचे हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स), प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना राबवल्या. याचा परिणाम आरोग्य व्यवस्था सुधारण्यात झाला. राबवण्यात आलेल्य्या योजनांचा परिणाम चांगला झाला आहे. महिलांना या योजनांचा मोठा लाभ मिळत आहे.

‘शाश्वत विकास ध्येय’ पूर्ण करण्याचे लक्ष्य

पूर्वी माता मृत्यू दर वाढत होता. त्यामुळे गरोदर महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. हे लक्षात घेऊन माता मृत्यू दरात घट होण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. भारताने माता मृत्यूदर प्रति लाख जन्मांमागे ७० च्या खाली आणण्याचे ‘शाश्वत विकास ध्येय’ २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले. ते लक्ष्य गाठण्यात भारताला यश आले आहे. देशातील हा दर सध्या ८८ पर्यंत खाली आला असून लवकरच भारत ७० चा टप्पा पार करेल, असा विश्वास आहे. जगातील २०४ देशांपैकी १०४ देश अजूनही ७० पेक्षा कमी माता मृत्यूदराचे लक्ष्य गाठू शकलेले नाहीत.

२०२३ मध्ये जगभरात एकूण २.४ लाख मातांचा मृत्यू

२०२३ मध्ये जगभरात एकूण २.४ लाख मातांचा मृत्यू झाला, म्हणजे प्रति एक लाख जन्मांमागे १९०.५ मातांचा मृत्यू झाला. १९९० च्या तुलनेत हे प्रमाण एक तृतीयांशने कमी आहे, जेव्हा हा दर ३२१ होता.

भारताने केलेली प्रगती आशादायक

२०२३ मध्ये भारतात एकूण २४,७०० माता मृत्यूची नोंद झाली. याच काळात नायजेरियात ३२,९००, इथियोपियात ११,९०० आणि पाकिस्तानात १०,३०० माता मृत्यूच्या घटना घडल्या. गेल्या ३० वर्षांत भारताने केलेली प्रगती ही जागतिक सरासरीपेक्षा (४८ टक्के घट) किती तरी पटीने अधिक असल्याचे वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ (आयएचएमई) ने केलेल्या या अभ्यासानुसार दिसून येते.

भारताच्या माता मृत्यू दराबाबत महत्त्वाची माहिती

प्रगती: २००० ते २०२३ दरम्यान देशात माता मृत्यूमध्ये सुमारे ८० टक्के घट झाली आहे.
ध्येय: २०३० पर्यंत माता मृत्यू दर ७० पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.
टॉप राज्ये (कमी MMR): केरळ (२०), महाराष्ट्र (३८), तेलंगणा (४५), तामिळनाडू (४९), राष्ट्रीय आरोग्य अभियानानुसार.
उच्च मृत्यूदर राज्ये: आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथे अद्यापही अधिक माता मृत्यू दर आहे.
मृत्यूची प्रमुख कारणे: प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब आणि बाळंतपणानंतरचा संसर्ग.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts