ruapli chakankar Summons : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (ashok kharat) प्रकरण रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांना जड जाण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोग व राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर विशेष तपास पथकाची त्यांच्याकडे करडी नजर वळली आहे. शिवनिका ट्रस्टच्या (Shivanika Trust) पदाधिकाऱयांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसे समन्स पाठवले गेल्याची माहिती हाती आली आहे. परिणामी रुपाली चाकणकर यांच्या भोवतीचा फास आवळला गेला आहे.
हे ही वाचा: भारताची आरोग्य क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी; माता मृत्यूदरात ८० टक्क्यांची घट
असंख्य महिलांचे लैंगिक शोषण
अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. खरात याने असंख्य महिलांचे लैंगिक शोषण केले. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले. या व्हिडिओमुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. परिणामी राज्यात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन केले. विशेष तपास पथकाने तपासाची चक्रे फिरवताना या प्रकरणी ८ महिलांनी गुन्हे दाखल केले. त्या दृष्टीने तपास सुरु झाला.
अनेक महिला नेत्यानी उठवला आवाज
दरम्यान,अशोक खरात याच्याबरोबर रुपाली चाकणकर याचे घरगुती संबंध असल्याचे अनेक फोटोंवरून समोर आले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राज्यातील अनेक महिलांनी रुपाली चाकणकर यांना या प्रकरणात सहआरोपी करावे यासाठी मागणी करण्यात आली. त्यात सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, अंजली दमानिया, तृप्ती देसाई या महिला नेत्यांनी आघाडी घेतली.
विशेष तपास पथकाची भेट
एवढंच नाही तर या महिला नेत्यांनी विशेष तपास पथकाच्या मुख्य तेजस्वी सातपुते व नाशिक पोलीस कमिशनर संदीप कर्णिक यांची भेट घेतली. त्यांनी चाकणकर यांच्या विरोधातील काही पुरावे संबंधितांना दिले. त्यामुळे विशेष तपास पथकाने हालचाल केल्याचे दिसून येत आहे. चाकणकर यांना समन्स गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याची कसून चौकशी होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
खरात याच्या अनेक आर्थिक व्यवहाराची होणार चौकशी
खरातने लैंगिक शोषण करताना हजारो कोटींची माया जमवली. त्याने अनेक ठिकाणी जागा घेतली. त्यामुळे त्याचीही कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान,विशेष तपास पथकाने आता रुपाली चाकणकर यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. त्यांना समन्स बजावून चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. कारण रुपाली चाकणकर यांनी काही आर्थिक व्यावहार केला आहे का? याचीही तपासणी केली जाणार आहे.












