Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरातचा (Ashok Kharat) खरा चेहरा आता समोर आला आहे. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अशोक खरातला बेड्या ठोकल्या आहेत. ढोंगी खरातने अनेक महिलांचा गैरफायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने विवाहित महिला, तरूणींचे लैंगिक शोषण केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी खरातवर गुन्हा दाखल केला आहे. आत्तापर्यंत खरातवर 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दररोज अनेक पीडित महिला खरातविरोधात तक्रार करताना दिसत आहेत.
हेही वाचा – मंत्रिपदासाठी नीलम गोऱ्हे अशोक खरातकडे गेलेल्या…, तृप्ती देसाईंचा मोठा गौप्यस्फोट, केले गंभीर आरोप
सध्या अशोक खरात प्रकरणाचा तपास नाशिक पोलीस आणि विशेष तपास पथकाकडून केला जात आहे. तर या तपासात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आताही अशोक खरातबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे.
अशोक खरात महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी कोणता प्रसाद द्यायचा?
अशोक खरात हा पीडित महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रसादाचा वापर करत होता. तो प्रसाद म्हणून पीडित महिलांना विशिष्ट प्रकारचे खारट पाणी आणि पेढे देत होता. हा प्रसाद खाल्ल्यानंतर महिला खरातच्या सुचनांचं पालन करत होत्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेष तपास पथकाने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा त्याच्या कार्यालयात महिलांना बोलवत असते. तिथे तो महिलांना काही द्रव पदार्थ प्यायला द्यायचा, तसेच पेढे देखील खायला द्यायचा. हे पदार्थ खाल्ल्यानंतर आणि द्रव पदार्थ पिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच महिलांचं डोकं गरगरायचं, मळमळ सुरू होत होती, डोकं जड व्हायचं आणि गुंगी यायची. महिला अर्धवट शुद्धीत असायच्या. त्यामुळे महीला खरातच्या सर्व सुचनांचं पालन करत होत्या. याच परिस्थितीचा फायदा घेत खरात कार्यालयातील लाईट बंद करून महिलांवर लैंगिक अत्याचार करत होता.
ढोंगी खरात हा महिलांना जे खारट आणि कडू असे औषध द्यायचा, त्यामध्ये नेमके काय घटक होते? याबाबतचे गूढ निर्माण झाले आहे. तसेच तो महिलांना जे पेढे खायला द्यायचा त्यात तो कोणते औषध मिसळायचा? याबाबतचा तपास सध्या एसआयटी करत आहे.
कोर्टात सरकारी वकीलांनी सांगितले की, अशोक खरात हा तपासात कसलेही सहकार्य करत नाहीये. तो वापरत असलेल्या औषधांबाबत कोणतीही ठोस माहिती देत नाहीये. त्यामुळे या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी खरातच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.












