Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • अशोक खरातच्या बंगल्यावर एसआयटीची धाड; पत्नी फरार, मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
Top News

अशोक खरातच्या बंगल्यावर एसआयटीची धाड; पत्नी फरार, मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदुबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. तर खरातला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

हेही वाचा  – “शॉर्टकटने पैसे कमवण्याचा प्रयत्न…”, चेक बाऊन्स प्रकरणावरून अक्षय कुमारचं राजपाल यादवबाबत खळबळजनक वक्तव्य

अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार?

अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार असल्याची माहिती समोर आली आहे. काल मध्यरात्री एसआयटीने अशोक खरातच्या बंगल्यावर छापा टाकला होता. यावेळी खरातची पत्नी फरार असल्याचं उघडकीस आलं. तर एसआयटीने खरातच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

एसआयटीने टाकला खरातच्या बंगल्यावर छापा

अशोत खरातचा नाशिकच्या कर्मयोगी नगर भागात एक बंगला आहे. या बंगल्यावर एसआयटीच्या पथकानं छापा टाकला होता. यावेळी एसआयटीच्या पथकात तीन महिला तर एक पुरूष अधिकारी यांचा समावेश होता. जेव्हा एसआयटीच्या पथकाने खरातच्या बंगल्याचे गेठ ठोठावले तेव्हा कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शेजारील बंगल्याच्या भितींवरून उडी मारून खरातच्या बंगल्यात प्रवेश केला. यावेळी अधिकाऱ्यांनी खरातच्या संपूर्ण घराची झडती घेतली. मात्र, खरातची पत्नी कल्पना खरात बंगल्यात सापडली नाही.

एकिकडे खरातची पत्नी फरार असताना दुसरीकडे एसआयटीने अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनला ताब्यात घेतले आहे. सध्या हर्षवर्धनवर पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नसून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. हर्षवर्धनला महाराष्ट्र पोलीस अकॅडमधीमध्ये चौकशीसाठी नेले आहे.

दरम्यान, आज अशोक खरातला कोर्टात हजर केले जाणार आहे. यापूर्वी विशेष तपास पथकानं खरातच्या कार्यालयावर धाड टाकली. या तपासात अनेक पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत. खरातच्या कार्यालयात एक वही, काळे पेढे, काळी फळे आणि संशयास्पद काही यंत्रही सापडली आहेत.

ज्या कार्यालयात अशोक खरात महिलांना भूल घालत त्यांचे लैंगिक शोषण करायचा त्या कार्यालयाची कसून तपासणी करण्यात आली. या तपासादरम्यान खरातन कार्यालयाला साऊंडप्रूफ काच आणि दरवाजे लावल्याचं समोर आलं आहे. त्याच्या केबिनमधील आवाज बाहेर जात होता का? आणि त्याच्या केबिनमधील सर्व गोष्टी बाहेरच्यांना दिसत होत्या का? याबाबतही पोलिसांनी शोध घेतला आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts