Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) ढोंगी ज्योतिषी अशोक खरातचे (Ashok Kharat) काळे कारनामे समोर आले आहेत. अशोक खरातने अनेक महिलांची फसवणूक करत त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. तर त्याने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. याच ढोंगी अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत, उद्योगपतींसोबत जवळचे संबंध होते. धर्माच्या नावाखाली खरातने अनेकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तर या प्रकरणाचा संपूर्ण तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे. एसआयटीच्या तपासात आता खरातबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
हेही वाचा – शिंदे गटाच्या बड्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?
एसआयटीने मंगळवारी (31 मार्च) केलेल्या चौकशीत खरातचा नवीन प्रताप समोर आला आहे. अशोक खरात हा चार वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चारही क्रमांकावरून तो वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली आहे.
ढोंगी खरात चार क्रमाकांवरून कोणाशी साधत होता संपर्क?
ढोंगीबाबा अशोक खरात पहिल्या मोबाईल क्रमांकाचा वापर हा फक्त बड्या राजकीय नेत्यांसोबत संवाद साधण्यासाठी करत होता. राजकीय क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्याच्या उद्देशाने खरातने अनेक राजकीय नेत्यांसोबत जवळीक साधली होती. त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंधही होते. त्यामुळे राजकीय नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी खरात पहिल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करत होता.
दुसरा खास मोबाईल क्रमांक हा महिलांसोबत संपर्क साधण्यासाठी खरात वापरत होता. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा श्रीमंत लोकांशी आणि महिलांशी संपर्क साधण्यासाठी दुसऱ्या मोबाईल क्रमाकांचा वापर करत होता. तर याच क्रमांकावरून खरात महिलांशी संपर्क साधत त्यांच्याशी जवळीक साधत त्यांचा गैरफायदा घेत होता.
खरात तिसऱ्या मोबाईल क्रमांकाचा वापर हा आर्थिक व्यवहारासाठी करत होता. फक्त पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी खरातने हा तिसरा क्रमांक ठेवला होता. तर चौथा मोबाईल क्रमांक हा खरातने सार्वजनिक केला होता. सामन्य भक्तांसाठी आणि आपली लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी खरातने हा क्रमांक ठेवला होता.
अशाप्रकारे अशोक खरात या चारही मोबाईल क्रमांकाचा वापर करत होता. तर खरातने यापूर्वी अनेक तांत्रिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आता खरातचे चारही मोबाईल फॉरेन्सिक टिमने ताब्यात घेतले असून त्यातील चॅट, डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू केले आहे. खरातच्या या नवीन कारनाम्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. तर आता फॉरेन्सिक टिमने त्याच्या चारही फोनमधील डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू केले असून या डेट्यामधून नवीन माहिती बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.











