Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांच्या विश्वासाचा फायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अशोक खरातला अटक केली आहे. तर काल खरातची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी विशेष तपास पथकाच्या (SIT) अधिकाऱ्यांनी काही पुरावे कोर्टात सादर केले. त्यानंतर कोर्टाने खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच आजही खरातला कोर्टात हजर केलं जाणार होतं.
हेही वाचा – राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचे 25-30 आमदार भाजपमध्ये जाणार? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
खरातच्या जीवाला धोका, SIT नं काय घेतला मोठा निर्णय?
अशोक खरातला आज आणखी एका दुसऱ्या गुन्ह्यासंदर्भात अशोक खरातला न्यायालयात हजर केलं जाणार होतं. मात्र, खरातच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आल्यामुळे विशेष तपास पथकाने मोठा निर्णय घेतला आहे.
भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवाला धोका असल्यामुळे विशेष तपास पथकाने न्यायालयाकडे ऑनलाईन सुनावणी करण्याची विनंती केली होती. तर खरातच्या सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाने देखील एसआयटीची ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे आज सुनावणीसाठी खरातला न्यायालयात हजर केलं जाणार नाहीये. ऑनलाईन पद्धतीनेच आजची सुनावणी घेतली जाणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीत न्यायाधीश नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, काल न्यायालयाने अशोक खरात प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जाणार आहे. अशोक खरातला न्यायाधीश श्रीमती बी इन ईचपुरानी यांच्या कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायधीशांनी काही कागदपत्रे तपासली आणि बाकी माहिती तपास अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये अशोक खरातला न्यायाधीशांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर आजच्या ऑनलाईन सुनावणीत न्यायाधीश नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खरातने अनेक भक्तांची आर्थिक फसवणूक देखील केल्याचं समोर आलं आहे. खरातच्या या काळ्या कारनाम्यांमुळे संपू्र्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.












