Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र हादरला! भोंदू अशोक खरातचा आणखी एक काळा कारनामा समोर; 132 खात्यांचा मोठा गौप्यस्फोट
Top News

महाराष्ट्र हादरला! भोंदू अशोक खरातचा आणखी एक काळा कारनामा समोर; 132 खात्यांचा मोठा गौप्यस्फोट

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातचे सर्व काळे कारनामे बाहरे पडत आहेत. त्यामुळे भोंदू खरातचा खरा चेहरा आता सर्वांसमोर आला आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. तर शेतकऱ्यांच्या जमिन-जुमला देखील लुटल्या आहेत. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अशोक खरातला बेड्या ठोकल्या आहेत. तर आता या प्रकणाचा संपूर्ण तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे.

हेही वाचा –  आधी बापाचे कारनामे उघड अन् नंतर…; अशोक खरात प्रकरणाने घेतलं धक्कादायक वळण, नव्या ट्विस्टची एन्ट्री

अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांचा पर्दाफाश

विशेष तपास पथकाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आताही एसआयटीने केलेल्या तपासात खरातचा आणखी एक काळा कारनामा समोर आला आहे. ढोंगी अशोक खरातने करोडो रूपयांचा व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे.

पतसंस्थेत खरातची किती होती खाती?

भोंदू खरातचे समता आणि जगदंब पतसंस्थेत 132 खाती असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 10 ते 11 खातेदारांची चौकशी केली आहे. शिर्डी येथील राहाता परिसरामध्ये खरातचे तीन पतसंस्थेत खाती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच सिन्नरच्या जगदंब पतसंस्थेमध्ये भोंदू खरातने तब्बल 32 खाती उघडल्याचा खुलासा झाला आहे. त्याने तब्बल पावणेतीन कोटींची उलाढाल केली असल्याची माहिती समोर आली आहे.

खरातच्या 132 खात्यांबाबत आता खुलासा झाला असून खरातने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. त्याने अनेक आर्थिक गैरव्यवहार करत लोकांना लुबाडलं आहे. त्यामुळे आता एसआटीकडून खरातच्या आर्थिक व्यवहारांचा कसून तपास केला जात आहे.

दरम्यान, विशेष तपास पथकानं खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातची दोन दिवस कसून चौकशी केली होती. चौकशीदरम्यान हर्षवर्धनने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने पोलिसांसमोर कबूल केले की, आमच्या घरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कॅश येत होती. ते पैसे कुठून येत होते याबाबत मला काहीही माहिती नाही. कारण या पैशांचे सर्व व्यवहार डॅड अशोक खरात यांच्याकडे होते. त्यांना प्रत्येक व्यवहाराची माहिती होती, अशी कबुली हर्षवर्धने दिली आहे. खरातच्या मुलाने दिलेल्या जबाबनंतर खरातने अनेक लोकांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात केल्याचं समोर आलं आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts