Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • एका बॉटलने घडवला अपघात? मुंबई-गोवा हायवेवर खासगी बस उलटल्याने 2 जणांचा मृत्यू, 38 प्रवासी जखमी
Top News

एका बॉटलने घडवला अपघात? मुंबई-गोवा हायवेवर खासगी बस उलटल्याने 2 जणांचा मृत्यू, 38 प्रवासी जखमी

Mumbai Goa Highway Bus Accident | मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी घाटात एका खासगी बसचा मोठा अपघात (Bus Accident) झाला आहे. या अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 38 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. प्रवासी बस उलटल्याने हा भीषण अपघात घडला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – महाराष्ट्र हादरला! भोंदू अशोक खरातचा आणखी एक काळा कारनामा समोर; 132 खात्यांचा मोठा गौप्यस्फोट

प्रवाशांनी भरलेल्या बसचा अपघात नेमका कसा घडला?

मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी घाटात पहाटेच्या सुमारास प्रवासी बसचा मोठा अपघात झाला. नागोठणे जवळ असलेल्या सुकेळी घाटातील चढणीवर हा भीषण अपघात घडला. ब्रेक पॅडलखाली बॉटल अडकल्यामुळे बसचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एक खासगी बस प्रवाशांना घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. यादरम्यान पहाटे पावणे तीनच्या सुमारास बस सुकेळी घाटात होती. यावेळी बस चालक हेमंत पाटीलने गाडीचा वेग वाढवला, नंतर त्याला गाडीवर ताबा मिळवता आला नाही आणि बस एका बाजूला पलटी झाली. या अपघातात वकिल नीलम विभुते (वय 40) आणि नईम शेख (वय 33) यांचा दुर्दैवी मृत्यू झआला आहे. तर 38 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताबाबत बस चालकाचा खळबळजनक दावा

या अपघातनंतर बस चालक हेमंत पाटीलने खळबळजक दावा केला आहे. ब्रेक पॅडखाली बॉटल अडकल्यामुळे हा अपघात घडला असल्याचा दावा हेमंत पाटीलने केला आहे. तर हा अपघात घडल्यानंतर जवळच्या स्थानिक नागरिकांनी आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मदतीसाठी तातडीनं धाव घेतली होती. अपघातामध्ये अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. तर या सर्व जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर यातील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, नागोठाणे पोलिसांनी या अपघात प्रकरणी बस चालक हेमंत पाटीलवर गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणाने गाडी चालवल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts