Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • उन्हाळ्यात सब्जा बियांचे पाणी का ठरते सुपरड्रिंक? जाणून घ्या जबरदस्त फायदे
ताज्या बातम्या

उन्हाळ्यात सब्जा बियांचे पाणी का ठरते सुपरड्रिंक? जाणून घ्या जबरदस्त फायदे

Summer Health Tips | सध्या कडक उन्हाळ्याचे (Summer) दिवस सुरू झाले आहेत. उन्हाळा सुरू झाला की अनेकांना उष्णतेचा, डीहायड्रेशनचा त्रास होताना दिसतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड आणि थंड ठेवण्यासाठी लहान सब्जाच्या बिया फायदेशीर ठरतात. प्रथिने, ओमेगा-3 आणि फायबरने समृद्ध असलेले सब्जाच्या बियांचे पाणी फक्त शरीराला ऊर्जाच देत नाही, तर पचनक्रिया आणि वजन नियंत्रणातही मदत करते. चला तर मग आता आपण सब्जाच्या बियांचे खास फायदे जाणून घेणार आहोत. तसेच त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धतही जाणून घेऊया.

काय आहेत सब्जाच्या बियांचे प्रभावी फायदे?

सब्जाच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे सब्जाच्या बियांचे पाणी नियमित पिल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते आणि हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत होते.

सब्जाच्या बिया उन्हाळ्यासाठी एक उत्तम पदार्थ आहेत कारण त्या शरीराला थंडावा देण्यास मदत करतात आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतात. या बिया पाण्यात भिजवल्यावर त्या जेलीसारख्या घट्ट होतात. तर या बियांचे पाणी दररोज पिल्यामुळे या शरीरातील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यातील पेयांसाठी या बियांचे पाणी एक उत्तम पर्याय आहे.

सब्जाच्या बियांमध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड यांसारखी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक उर्जेचे उत्कृष्ट स्रोत आहेत. त्यामुळे जेव्हाही आपण या बिया खातो तेव्हा पोट जड वाटत नाहीत.

सब्जाच्या बियांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनास मदत करते आणि पचनसंस्था निरोगी ठेवते. सब्जाच्या बिया पाण्यात भिजवल्यानंतर त्यापासून एक जेलीसारखा पदार्थ तयार होतो, जो प्रीबायोटिक म्हणून काम करतो आणि पचनसंस्थेच्या आरोग्यास मदत करतो. उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना पोट फुगणे आणि आम्लपित्त यांसारख्या पचनाच्या समस्या सामान्यपणे आढळतात. तर या सब्जाच्या बिया तुमची पचनसंस्था थंड व व्यवस्थित कार्यरत ठेवण्यास मदत करतात.

प्रत्येकाने सब्जाच्या बियांचे पाणी नियमित सेवन केले पाहिजे. यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या शारीरिक समस्यांपासून आपला बचाव होतो. तर हे पाणी बनवण्यासाठी झोपण्यापूर्वी एका ग्लास पाण्यात एक चमचा सब्जाच्या बिया भिजवा. नंतर सकाळी, पाणी थोडे कोमट करून त्यात लिंबाचा रस आणि काळे मीठ घाला आणि चांगले ढवळून रिकाम्या पोटी प्या.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts