• Home
  • महाराष्ट्र
  • SIT तपासात मोठा खुलासा; भोंदू खरात प्रकरणात नाशिकच्या बड्या महिला अधिकाऱ्याचं कनेक्शन?
Top News

SIT तपासात मोठा खुलासा; भोंदू खरात प्रकरणात नाशिकच्या बड्या महिला अधिकाऱ्याचं कनेक्शन?

Kharat devotees visit charges

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. अशोक खरातला विविध गुन्ह्यांखाली नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अटक केली आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. तर त्यांने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे. तर एसआयटीच्या तपासात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आताही खरात प्रकरणात आणखी एक नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे.

हेही वाचा – मुंबईत रचला दिल्ली हादरवण्याचा कट; स्पेशल सेलच्या कारवाईने मोठं षड्यंत्र उधळलं

खरात प्रकरणी नाशिकची वरिष्ठ महिला अधिकारी अडचणीत

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी नाशिकची एक वरिष्ठ महिला अधिकारी अडचणीत सापडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा संबंध अशोक खरातशी असल्याची माहिती एसआयटीच्या तपासातून समोर आली आहे. या महिला अधिकाऱ्याने आपली पोस्टिंग असताना प्रशासकीय पातळीवर अशोक खरातची मदत केली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता ही महिला अधिकारी एसआयटीच्या रडारवर आहे.

महिला अधिकाऱ्याचं ढोंगी खरातसोबत नेमकं काय आहे कनेक्शन?

नाशिकची तत्कालीन महिला अधिकाऱ्याने अशोक खरातला मदत केली होती. तर याच मदतीच्या बदल्यात खरातने या महिला अधिकाऱ्याला त्यांच्या पसंतीची पोस्टिंग दिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता लवकरच एसआयटीकडून या महिला अधिकाऱ्याची चौकशी केली जाणार आहे. महिला अधिकारी आणि अशोक खरातमध्ये काही आर्थिक व्यवहार झाले होते का? याबाबतचाही तपास एसआयटी करणार आहे. तर या प्रकरणाने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आता एकच खळबळ उडाली आहे.

ढोंगी अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत, उद्योगपतींसोबत जवळचे संबंध होते. धर्माच्या नावाखाली खरातने अनेकांची फसवणूक केली आहे. तसेच अशोक खरातने अनेक महिलांची फसवणूक करत त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. तर त्याने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे.

दरम्यान, अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांची पोलीस चौकशी करत होते. यामध्ये पोलिसांनी खरातचा मुलगा हर्षवर्धनला ताब्यात घेत त्याची दोन दिवस कसून चौकशी केली होती. त्यानंतर त्याला सोडण्यात आले होते. तर चौकशी झाल्यानंतर हर्षवर्धनने पोलिसांना कोणतीही माहिती न देता तो अचानक शहरातून गायब झाला आहे. त्यामुळे आता नाशिक पोलीस खरातच्या पत्नीचा आणि खरातच्या मुलागा शोध घेत आहेत. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपली पथके रवाना केली आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts