Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • कुंभमेळ्यात चर्चेत आलेल्या IIT बाबाने केलं लग्न; कोण आहे अभय सिंहची जीवनसाथी?
Top News

कुंभमेळ्यात चर्चेत आलेल्या IIT बाबाने केलं लग्न; कोण आहे अभय सिंहची जीवनसाथी?

IITian बाबाची

Abhay Singh Marries Engineer Pratika: प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामध्ये चर्चेत आलेला IITian बाबा म्हणून ओळखला जाणारा अभय सिंह पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. नुकतंच त्यांनी लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. चला तर जाणून घेऊयात त्याची पत्नी कोण आहे.

महाकुंभमेळ्यात त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते आणि त्याची वेगळी जीवनशैली अनेकांना आकर्षित करत होती. आता मात्र अभय सिंहने लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. तो ६ एप्रिल रोजी हरियाणातील झज्जर येथे आपल्या पत्नीसोबत दिसला. त्याने सांगितले की, १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हिमाचल प्रदेशातील अघंजर मंदिरात त्यांनी विवाह केला आणि १९ फेब्रुवारीला कोर्ट मॅरेजही केले आहे.

हेही वाचा: CBSE 10वीचा निकाल ‘या’ तारखेला लागू शकतो; जाणून घ्या चेक करण्याची पद्धत

अभय सिंह मुलाखतीत सांगतिले की, तो आणि त्याची पत्नी प्रतिका आनंदाने नवीन आयुष्य जगत आहेत. प्रतिका ही कर्नाटकची रहिवासी असून ती इंजिनिअर आहे. लग्नानंतर दोघेही हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे स्थायिक झाले असून तिथेच त्यांचा संसार सुरू आहे.

अभय सिंह आपल्या कुटूंबाला भेटण्यासाठी झज्जरला गेला होता. भगवे वस्त्र परिधान करून त्याने वडिलांना भेट दिली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला की, अध्यात्माकडे वळण्यापूर्वी वडिलांच्या कार्यालयात कायदेशीर कामे आणि केस स्टडी करत असे. जीवनाचा खरा अर्थ शोधताना त्याचे विज्ञान तंत्रज्ञानाचा मार्ग सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.

https://x.com/askshivanisahu/status/2041086871674233174

अभय सिंहचे कुटुंब मूळचे झज्जरमधील सासरौली गावचे आहे. त्याचे वडील कर्ण सिंह हे वकील असून ते झज्जर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत.

प्रतिकानेही अभयबद्दल बोलताना सांगितले की, तो खूप साधा, प्रामाणिक आणि सरळ स्वभावाचा आहे. दोघांची भेट सुमारे एक वर्षापूर्वी झाली होती. आता दोघे मिळून सनातन धर्म आणि अध्यात्माचा प्रसार करण्याचा संकल्प करत आहोत. भविष्यात “सनातन विद्यापीठ” स्थापन करण्याचाही त्यांचा विचार आहे, जिथे गुरु, साधक आणि अध्यात्माशी संबंधित लोक एकत्र येऊ शकतील.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts