RR vs MI rain IPL : आयपीएलच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसामुळे रद्द (Match cancelled due to rain) करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात 6 एप्रिलला झालेल्या सामन्यात 3.2 ओव्हरचा खेळ झाला. त्यानंतर आलेल्या पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पावसामुळे सव्वा 3 तासांचा खेळ वाया गेला. आता दुसरा सामना रद्द (Second match cancelled) होणार का? यामुळे आयपीएल सामन्यांना पावसाचे ग्रहण लागले का? असा सवाल क्रिकेटप्रेमी उपस्थित करत आहेत.
पाऊस कमी झाल्यावर चाहत्यांना सामना सुरु होईल अशी आशा होती. मात्र अखेर खेळपट्टीची परिस्थिती पाहून सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर आता सलग दुसरा सामनाही पावसामुळे रद्द होतो की काय? अशी स्थिती पाहायला मिळत आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने
स्पर्धेतील 19 व्या मोसमातील 13 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. चाहत्यांचं सामन्याआधी टॉस कोण जिंकतो? याकडे लक्ष होतं.
पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे टॉसला विलंब
मात्र, पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस होतो. मात्र पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे टॉसला विलंब झाला आहे. पावसामुळे 30 मिनिटं वाया गेली आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना पावसाच्या विश्रांतीची वाट पाहावी लागणार आहे.












