• Home
  • महाराष्ट्र
  • भोंदू खरात प्रकरणात मेगा प्लन, SIT प्रमुख तेजस्वी सातपुते सर्वच सांगितलं
Top News

भोंदू खरात प्रकरणात मेगा प्लन, SIT प्रमुख तेजस्वी सातपुते सर्वच सांगितलं

Bhondu Kharat case SIT

Bhondu Kharat case SIT : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातवर 11 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यात महिलांचे लैंगिक शोषण, भोंदू गिरी, जादुटोणा, फसवेगिरी यासह वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या घटनेतील पीडीत महिलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे काही महिलांची बदनामी समोर आले आहे, अशातच आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT च्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली आहे.

खरात बदनामीची धमकी देऊन लैंगिक शोषण करत होता सातपुते तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, चौकशीतून आरोपी खरात पीडीत व्यक्तीच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. धमकी देत होता. भीती दाखवत होता. खडे, चिंचोके इत्यादी गोष्टीद्वारे पैसा उकळत होता. महिलांना दैवी शक्ती असल्याचं सांगत होता. कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून, त्यांना बदनामीची धमकी देऊन लैंगिक शोषण करत होता. ईशान्यश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात दैवी शक्ती असल्याचं भासवून अंधश्रद्धा पसरवत होता.’

पोलिसांच्या पत्रकार परिषदांनाही मर्यादा

पुढे बोलताना तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, ‘लोक काय म्हणतील या भीतीने महिलांनी अन्याय सहन केला आहे. धाडसाने त्यांनी गुन्हे दाखल केला आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटवू नका. त्यांचे व्हिडीओ व्हायरल करू नका, आणि मोबाईलमध्ये त्यांचे व्हिडीओ ठेवू नका. हे आपलं कर्तव्य आहे. त्यांचं मानसिक आरोग्य आणि धैर्य टिकवून राहिलं पाहिजे. अशा केसेसमध्ये पोलिसांच्या पत्रकार परिषदांनाही मर्यादा निश्चित केल्या आहेत. पीडितेच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचं ज्या प्लॅटफॉर्मवर दिसून येत आहे, तिथून ते व्हिडीओ हटवण्यास सांगितले आहे. पीडितांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची ओळख उघड केल्यास शिक्षा होते.

व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना अटक

तेजस्वी सातपुते यांनी पुढे म्हटले की, ‘पीडितांच्या व्हिडीओच्या एकूण 4650 लिंक्स सायबर टीमने डिलिट केल्या आहेत. 4 जणांची टीम व्हिडिओवर लक्ष ठेऊन आहेत. हे लोक पूर्णवेळ तेच काम करत आहेत. काही मिनिटांमध्ये नवीन काही अपलोड झालं का ते शोधणं आणि त्याला रिपोर्ट करण्याचं काम सुरू आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वारंवार टाकणाऱ्या ग्रुपला बंद केलं आहे. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर दोन जणांना अटक केली आहे. अहिल्यानगर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts