Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • शेअर बाजारात मोठी उसळण, ‘हे’ शेअर्स फायद्यात?
Top News

शेअर बाजारात मोठी उसळण, ‘हे’ शेअर्स फायद्यात?

stock market surge profitable shares

stock market surge profitable shares : जागतिक राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींचे सकारात्मक पडसाद आज भारतीय शेअर बाजारात (Indian stock market) उमटले आहेत. युद्धाच्या छायेखाली असलेल्या जगाला ‘सीझफायर’च्या (Ceasefire) निर्णयाने मोठा दिलासा मिळाल्याने आज भारतीय शेअर बाजार एका मोठ्या उसळणीसह उघडला. प्री-ओपनिंग सत्रातच (Pre-Opening Session) सेन्सेक्सने तब्बल २७०० हून अधिक अंकांची ऐतिहासिक झेप घेतल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे (Enthusiasm among investors) वातावरण आहे. युद्धविरामानंतर भांडवली बाजारात तेजी (Bullish trend in the capital market) आल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा – इराण-अमेरिका युद्धविराम! सोने-चांदीचा उच्चांक, ‘हे’ आहे आजचा भाव..

सेन्सेक्समध्ये २ हजार ७०० अंकांची उसळी तर निफ्टी ७५० अंकांनी वधारला आहे. आयटी, मेटल, रिअॅल्टी क्षेत्रातील समभागात मोठी तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या भावात देखील मोठी घसरण झाली आहे, १३ टक्क्यांनी दर पडले आहेत. कच्च्या तेलाचे भाव ९५ डाॅलर प्रति बॅरलवर आले आहेत. अदानी पोर्ट, इंडिगोच्या समभागात मोठी उसळी पहायला मिळत आहे…

युद्धविरामाच्या आशेने गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह

इराण-अमेरिका युद्ध भीती निवळल्यामुळे जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांनी भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने २६०० हून अधिक अंकांची झेप घेतली, तर निफ्टी ७५० हून अधिक अंकांनी वधारला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने आणि युद्धविरामाच्या आशेने गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे…

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सकारात्मक संकेत

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्षात ‘सीझफायर’ म्हणजेच युद्धविरामाची घोषणा झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली स्थिरता आणि जागतिक पुरवठा साखळी पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाल्याने जगभरातील शेअर बाजारांनी या निर्णयाचे स्वागत केले. याचाच थेट परिणाम आज मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीवर दिसून आला.

येत्या काही दिवसांत नवे उच्चांक प्रस्थापित

तज्ज्ञांच्या मते, जर सीझफायरची स्थिती कायम राहिली आणि जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित झाली, तर भारतीय शेअर बाजार येत्या काही दिवसांत नवे उच्चांक प्रस्थापित करू शकतो…

आशियाई बाजारपेठांमध्ये जबरदस्त उत्साह

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यास संमती दिल्यानंतर आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे आज आशियाई बाजारपेठांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. जपानच्या निक्केई २२५ मध्ये १.७९ टक्क्यांची उसळण दिसून आली, तर टॉपिक्स मध्ये १.६९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. दक्षिण कोरियाच्या कोस्पी मध्ये ५.९९ टक्के आणि स्मॉल-कॅप कोस्डॅकमध्ये सुमारे ५ टक्क्यांची तेजी आली आहे.

बाजारपेठेला युद्धाची भीती उरलेली नाही

वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड फ्युचर्स १४ टक्क्यांनी घसरून ९७.४९ डॉलर प्रति बॅरलवर आले आहे, जे १०० डॉलरच्या मानसशास्त्रीय पातळीच्या खाली आहे. याचा अर्थ असा की, बाजारपेठेला आता युद्धाची तातडीची भीती उरलेली नाही. ब्रेंट क्रूड फ्युचर्स आज सकाळी १३ टक्क्यांनी घसरून ९५.६३ डॉलरवर आले आहे. COMEX वर कच्च्या तेलाच्या किमतीत १३.३३ टक्क्यांची घसरण झाली असून ते ९७.८९० डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे….

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts