• Home
  • बिजनेस
  • इराण-अमेरिका युद्धविराम! सोने-चांदीचा उच्चांक, ‘हे’ आहे आजचा भाव..
Top News

इराण-अमेरिका युद्धविराम! सोने-चांदीचा उच्चांक, ‘हे’ आहे आजचा भाव..

Iran US ceasefire gold silver rates

Iran US ceasefire gold silver rates : इराण-अमेरिकामध्ये (Iran-US War) गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या युद्धाला अखेर युद्धविराम (Iran-US Armistice) मिळालं आहे. युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात मोठ्या घडामोडी (Developments in Global Markets) घडण्यास सुरूवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सोनं-चांदीच्या दरामध्ये (Gold and Silver Rates) वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. सोनं-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे..

हेही वाचा – युद्ध थांबताच सोन्याची मोठी झेप! एका झटक्यात इतक्या रुपयांनी झाली वाढ; जाणून घ्या आजचे ताजे दर 

सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळण

इराण-अमेरिका किंवा मध्यपूर्वेतील युद्धविरामाच्या बातम्यांनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता कमी होऊन, सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळण पाहायला मिळते. युद्धाच्या काळात शेअर बाजार कोसळल्याने आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी वाढल्याने, अनेकदा युद्ध थांबल्यानंतर सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचतात, ज्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा धातूंकडे वळत आहेत.

इराण आणि अमेरिका युद्ध तात्पुरते थांबले

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाला वेठीला धरणारं आणि एका मोठ्या विध्वंसाच्या दिशेने वाटचाल सुरु असलेलं इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर तात्पुरते थांबले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन आठवड्यांसाठी इराणवर हल्ले करणार नाही, असे सांगत शस्त्रसंधीची घोषणा केली. त्याचवेळी ट्रम्प यांनी इराणकडून आलेला 10 कलमी तहाच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक संकेत दिले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड धास्तावलेल्या भांडवली बाजाराने सुटकेचा निश्वास टाकला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी होताच भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. याशिवाय, भारतीय गुंतवणुकदारांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला सोने आणि चांदीच्या दरातही मोठी वाढ होताना दिसत आहे.

चांदीच्या दरात किलोमागे 10 हजारांची वाढ

इराण-अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर बुधवारी सकाळी वायदे बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल पाहायला मिळाले. याशिवाय, स्थानिक बाजारपेठांमध्येही सोने आणि चांदीचा भाव वाढला आहे. मंगळवारी जीएसटी वगळता सोन्याचा भाव 1,47,500 रुपये इतका होता. तो बुधवारी तीन हजार रुपयांनी वाढून 1 लाख 51 हजार 500 रुपयांवर पोहोचला. तर चांदीच्या दरात किलोपाठी 10 हजार रुपयांची वाढ पाहायला मिळाली. काल एक किलो चांदाजी भाव 2 लाख 37 हजार इतका होता. तो बुधवारी सकाळी थेट 2 लाख 47 हजारांवर जाऊन पोहोचला आहे. इराण-अमेरिका युद्ध आता समाप्तीच्या दिशेने वाटचाल करु लागल्याने आगामी काळात सोन्याच्या भावात आणखी उसळी पाहायला मिळू शकते, असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांकडून वर्तवला जात आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts