Hair Fall Increases During April-May: एप्रिल-मेमध्ये केस जास्त गळणे सामान्य आहे. तापमान वाढल्यामुळे आणि ऋतू बदलल्यामुळे हे होते. पण यामागचं खरं कारण अनेकांना माहितीच नाही. चला तर जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती
एप्रिल- मेमध्ये केस जास्त गळणे अनेकांसाठी चिंतेचा विषय असतो, पण प्रत्यक्षात ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. या काळात वाढणारे तापमान आणि ऋतू बदल शरीरातील पित्त आणि हार्मोनल संतुलनावर परिणाम करतात, ज्यामुळे केसांच्या मुलांवर ताण पडतो.
आयुर्वेदानुसार हे पित्त दोषामुळे होते, तर आधुनिक विज्ञान हे हेअर ग्रोथ सायकलमधील नैसर्गिक टेलिजन फेज म्हणून समजते. दोन्ही दृष्टिकोन वेगळे असले तरी, योग्य आहार, नियमित तेलमसाज, योगासने आणि संतुलित जीवनशैलीने केस गाळण्यावर प्रभावी नियंत्रण ठेवता येते.
आणखी वाचा: “नवीन युगातील तुकारामाबद्दल माहिती नाही”; सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य चर्चेत
केस गाळण्याची आयुर्वेदिक कारणे
आयुर्वेदानुसार, शरीरातील पित्त दोषामुळे केस कमकुवत होतात आणि गळतात.
आधुनिक विज्ञान काय सांगत
पारंपरिक पद्धतीनुसार, एप्रिल-मे महिन्यात टेलोजेन फेज अधिक सक्रिय होते, ज्यामुळे केस गळतात. या काळात दिवस मोठे होते आणि सूर्यप्रकाशामुळे शरीरातील मेलाटोनिन हार्मोन कमी होतो, ज्यामुळे केसांच्या वाढीच्या चक्रावर परिणाम होतो. विज्ञान केस गळण्याला हार्मोनल आणि जैविक प्रक्रियांशी जोडते, तर आयुर्वेद असंतुलनाला दोष मानतो.
केस गळणे थांबवण्यासाठी उपाय
तेलाने मालिश करा
आठवड्यातून दोन-तीन वेळा १०-१५ मिनिटे डोक्याला हलकी मालिश करा. रक्तप्रवाह वाढल्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.
संतुलित आहार घ्या
खूप मसालेदार, खूप खारट किंवा खूप गोड पदार्थ टाळा. त्याऐवजी आवळा, पालेभाज्या आणि प्रथिने यांचा आहारात समावेश करा, ज्यामुळे पित्त नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
नियमित योग आणि प्राणायाम करा
हेल्दी आरोग्यासाठी नियमित योग आणि प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल.
सर्वांगासन
पर्वतासन
शीर्षासन
उत्तानसन
तणाव कमी करणे
केस गळण्यामागे तणाव हे एक प्रमुख कारण आहे. ध्यान, प्राणायाम किंवा हलका व्यायाम तणाव कमी करतो आणि केस मजबूत ठेवतो.
एप्रिल-मे महिन्यात होणारी केसगळती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी योग्य काळजी, संतुलित जीवनशैली आणि योगाद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते. आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही यावर सहमत आहेत की मुलांच्या आरोग्यासाठी नियमित काळजी घेणे आवश्यक आहे.
आणखी वाचा: घर खरेदीदारांची घटती रुची; २०२६ मध्ये रिअल इस्टेट बाजारात मंदी, ‘या’ शहरांची अवस्था बिकट












