Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरात सतत बदल होताना दिसत आहेत. तर आता सोने खरेदीदारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आज (9 एप्रिल) सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold And Silver Price) मोठी घट झाली आहे. काल अमेरिका (US) आणि इराण (Iran) या देशांनी युद्धबंदीची घोषणा केली होती. हे युद्ध थांबल्यानंत सोने-चांदीच्या किंमतीत घसरण होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र काल सोन्याच्या दरात वाढ झाली होती. पण, आज पुन्हा एकदा सोने-चांदीचे दर कोसळले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा – अखेर सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा? विजय वडेट्टीवारांचा खुलासा, काँग्रेसची भूमिका स्पष्ट
सोने-चांदीच्या दरात आज किती रूपयांनी झाली घसरण?
आज 24 कॅरेट सोन्याचे दर हे 2,340 रूपयांनी घसरले आहेत. आता 24 कॅरेट सोन्याचा दर 1,51,480 रूपये झाला आहे. तर 10 तोळे सोन्याचा दरात 23,400 रूपयांनी घसरण झाली आहे. आत्ता 10 तोळे सोन्याचा दर 15,14,800 रूपये एवढा झाला आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळ्यामागे 2,150 रूपयांनी कमी झाली आहे. आज प्रति तोळा सोन्याची किंमत 1,38,850 रूपये झाली आहे. तर 10 तोळे सोन्याची किंमत 21,500 रूपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता 10 तोळे सोन्याचे दर हे 13,88,500 रूपये एवढे झाले आहेत.
18 कॅरेट सोन्याचे दर हे 1,760 रूपयांनी घसरले आहेत. त्यामुळे 18 कॅरेट प्रति तोळा सोन्याचे दर हे 1,36,610 रूपये झाले आहेत. तसेच 10 तोळे सोन्याच्या किंमतीत 17,600 रूपयांची घसरण झाली असून याची किंमत 11,36,100 रूपये एवढी झाली आहे.
सोन्यासोबत चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 4,700 रूपयांची मोठी घसरण झाली आहे. आज चांदीचा दर हा 2,60,000 रूपये प्रति किलो झाला आहे. तर सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.












