Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • सोलापूरचा डंका जगभरात! एमपीएससीत विजय लामकाने राज्यात पहिला, तर आरती जाधव महिलांमध्ये प्रथम
Top News

सोलापूरचा डंका जगभरात! एमपीएससीत विजय लामकाने राज्यात पहिला, तर आरती जाधव महिलांमध्ये प्रथम

MPSC Result

MPSC Result 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल काल ८ एप्रिल २०२६ रोजी जाहीर झाला आहे. यात सोलापूरचे सुपुत्र विजय लामकाने राज्यात पहिला क्रमांक पटकावला, तर महिलांमध्ये आरती जाधव प्रथम क्रमांक मिळवला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल ८ एप्रिल २०२६ रोजी अधिकृत संकेतस्थळा mpsc.gov.in वर जाहीर केला आहे. या निकालानुसार विविध २० संवर्गांतील एकूण ४६१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

आणखी वाचा: आला रे आला, बजेटमध्ये फोन आला! AI+ Nova 2 सिरीज भारतात लॉन्च; दमदार फीचर्स अन् किंमत फक्त ८…

या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचे विजय नागनाथ लामकाने यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आरती परमेश्वर जाधव यांनी महिलांमध्ये प्रथम स्थान मिळवले आहे.

दीर्घ प्रतिक्षेनंतर निकाल जाहीर

राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल (MPSC Result 2024) उशिरा लागल्यामुळे अनेक उमेदवारांच्या मुलाखती व पुढील प्रक्रिया रखडल्या होत्या. अखेर आयोगाने निकाल जाहीर केल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गुण आणि कट-ऑफ संकेतस्थळावर उपलब्ध

आयोगाने अंतिम निकालासोबतच प्रत्येक प्रवर्गातील शेवटच्या शिफारसपात्र उमेदवारांचे गुण (कट-ऑफ) देखील जाहीर केले आहेत. उमेदवारांना त्यांचे वैयक्तिक गुण त्यांच्या प्रोफाइलमध्ये पाहता येणार आहेत.

नियुक्तीपूर्व अटी आणि पडताळणी

शिफारसपात्र उमेदवारांची निवड ही त्यांच्या अर्जातील माहिती आणि मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहणार आहे. अर्जातील माहिती चुकीची किंवा अपूर्ण आढळल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते.

काही उमेदवारांचा निकाल प्रलंबित

वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा निकाल अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आलेला नाही. तसेच, काही प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने निकाल संबंधित न्यायनिर्णयाच्या अधीन ठेवण्यात आला आहे.

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts