Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • धक्कादायक! भरदिवसा पेट्रोल पंपावर तरुणीची गळा चिरुन हत्या; आरोपीला काही तासांतच अटक
गुन्हा

धक्कादायक! भरदिवसा पेट्रोल पंपावर तरुणीची गळा चिरुन हत्या; आरोपीला काही तासांतच अटक

धक्कादायक! भरदिवसा पेट्रोल पंपावर तरुणीची गळा चिरुन हत्या; आरोपीला काही तासांतच अटक

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (9 एप्रिल, 2026) दुपारच्या सुमारास इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका तरुणीची तिच्याच ओळखीच्या व्यक्तीनं सर्वांसमक्ष हत्या केली. या घृणास्पद हत्येमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सार्वजनिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मृत महिलेची ओळख करमाड पेट्रोल पंपावरील कर्मचारी पूजा सुदाम गवांदे अशी पटली आहे. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी काही तासांतच मुख्य आरोपी सत्यम रावसाहेब गवांदे याला काचनेर गावातून अटक केली आहे.

वादातून झाला हल्ला :

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आरोपी सत्यम तिथं आला तेव्हा पूजा नेहमीप्रमाणे तिच्या कामात व्यस्त होती. ते दोघे आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरुन जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि सत्यमनं रागाच्या भरात जवळच पडलेला एक धारदार चाकू काढून पूजाच्या मानेवर वारंवार वार केले. हा हल्ला इतका गंभीर होता की, अतिरक्तस्रावामुळं पूजाचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : मुंबईला नेऊन दारु पाजली, लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मुलगी रस्त्यावर फेकली!

पोलिसांची जलद कारवाई :

गुन्हा केल्यानंतर आरोपी सत्यम घटनास्थळावरुन पळून गेला. घटनेची माहिती मिळताच, करमाड पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं, मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ वेगवेगळी पथकं तयार केली आणि तांत्रिक पाळत व गुप्त माहितीच्या आधारे त्याला कचनेर गावातून अटक केली.

प्रेमसंबंध आणि परस्पर वादाचा संशय :

संभाजीनगर पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, आरोपी आणि पीडित महिला प्रेमसंबंधात होते. गेल्या काही काळापासून त्यांच्यात तीव्र तणाव निर्माण झाला होता. ही पूर्वनियोजित हत्या होती की वादादरम्यान रागाच्या भरात अचानक घडलेली घटना होती, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी :

भरदिवसा एका गजबजलेल्या पेट्रोल पंपावर झालेल्या या हत्येमुळं जनतेमध्ये तीव्र संताप उसळला आहे. स्थानिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आपला खटला अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस सध्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts