Mia Khalifa | एकिकडे अमेरिका (US)-इराणने (Iran) युद्धबंदीची घोषण केली आहे. तर दुसरीकडे इस्त्रायलने (Israel) लेबनानवर (Lebanon) भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात लेबनानचे मोठ्या प्रमाणाच नुकसान झाले असून अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्याचे पडसाद जगभरात उमटताना दिसत आहे. आता या हल्ल्याबाबत सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर मिया खलीफा (Mia Khalifa) हिने संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा – “…तर ‘लाडकी बहीण’ योजना बंद करून टाका”, हायकोर्टाने राज्य सरकारला खडसावलं, नेमकं कारण काय?
लेबनान हल्ल्यानंतर मिया खलीफा नेमकं काय म्हणाली?
मूळची लेबनीज असलेली मिया खलीफा हिने एक व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये मिया भावूक होताना दिसत आहे. तर यावेळी तिने अमेरिका आणि इस्त्रायलवर गंभीर आरोप केले आहेत.
मिया खलीफाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने म्हटलं आहे की, फक्त 10 मिनिटांत 160 हून अधिक हवाई हल्ले करण्यात आले. यामध्ये शाळा, निवासी इमारती, रुग्णालये आणि स्मशानभूमींनाही लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या अनेक दशकांपासून इस्रायल हल्ले करत आहे. आताही आपण आपल्या डोळ्यांनी ‘नरसंहार’ होताना पाहत आहोत, असे मियाने म्हटले आहे.
पुढे ती म्हणाली की, लेबनानला उद्ध्वस्त करण्यासाठी माझ्या कष्टाच्या टॅक्सचा पैसा वापरला जात आहे, हे स्वीकारणे अशक्य आहे. असं अमेरिकेत राहण्याऱ्या मियाने म्हटले आहे. मिया ही मूळची लेबनीज असली तरी ती सध्या अमेरिकेत राहत आहे. यापार्श्वभूमीवर तिने हे वक्तव्य केले आहे.
View this post on Instagram
मियाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, इस्त्रायलने केलेल हे हल्ले म्हणजे ‘राज्य पुरस्कृत दहशतवाद’ आहे. अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश युद्ध गुन्ह्यांमध्ये सामील असून, त्यांचा नक्कीच एका दिवशी आंतरराष्ट्रीय न्यायालयात हिशोब होईल, असा इशारा मियाने दिला आहे. मियाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.











