Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • अभिनेता करण पटेलचा संसार मोडणार? 11 वर्षांनंतर घेणार घटस्फोट? बायकोने केला मोठा खुलासा
Top News

अभिनेता करण पटेलचा संसार मोडणार? 11 वर्षांनंतर घेणार घटस्फोट? बायकोने केला मोठा खुलासा

Karan Patel Divorce | टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता करण पटेल (Karan Patel) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. करण पटेल आणि त्याची पत्नी अंकिता भार्गव (Ankita Bhargava) हे दोघं एकमेकांना घटस्फोट (Divorce) देणार असल्याचं म्हटलं जात आहे. करण पटेलचा 11 वर्षांचा संसार मो़डणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या करण हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा –  ठाकरेंचे खासदार फुटून शिंदेंच्या सेनेत येणार? एकनाथ शिंदें स्पष्टच म्हणाले, “गेल्या एक वर्षापासून…”

करण पटेल आणि अंकिता भार्गवचा होणार घटस्फोट?

मागील काही दिवसांपासून करण आणि अंकिताच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तसेच त्या दोघांनी वकिलांसोबत चर्चा केली असल्याचंही म्हटलं जात आहे. अशातच आता या सर्व बाबींवर अंकिता भार्गवने स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.

करणची पत्नी नेमकं काय म्हणाली?

‘टेली मसाला’शी संवाद साधताना अंकिता भार्गवने म्हटलं आहे की, घटस्फोटाच्या सर्व अफवा आहेत. करणच्या आणि माझ्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारच्या अफवा फसरवणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. काही लोक फक्त लक्ष वेधण्यासाठी अशा चुकीच्या गोष्टी पसरवत आहे. यामध्ये काहीही तथ्य नाही, असं अंकिता म्हणाली.

पुढे ती म्हणाली की, मला आमच्या घटस्फोटाच्या अफवेबाबत एका मित्राकडून समजलं होतं. तसेच आमच्या जवळच्या व्यक्तींपैकीच कोणीतरी ही अफवा माध्यमांमध्ये पसरवली होती. त्यामुळे या अफवांना जास्तच खतपाणी मिळालं, असा धक्कादायक खुलासाही अंकिताने केला आहे.

मी आणि करण आम्ही दोघे एकत्र खूप खूश आहोत. आमचे आयुष्य खूप सुखात आणि शांततेत चालले आहे. त्यामुळे मला सोशल मीडियावर आमच्याबाबत काय चर्चा सुरू आहेत, याबाबत काहीही फरक पडत नाही, असंही अंकिता म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Patel (@karan9198)

दरम्यान, अंकिताने दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर करण आणि तिच्या घटस्फोटाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता करणच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts